​ रहना है तेरे दिल में या चित्रपटाद्वारे नव्हे तर या चित्रपटाद्वारे आर माधवनने केली होती बॉलिवूडमध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 09:25 AM2018-06-01T09:25:05+5:302018-06-01T14:55:05+5:30

आर माधवनने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आजवर त्याने रहना है तेरे दिल मैं, रंग ...

Raveena Hai Tere Dil Mein This film is not based on R. Madhavan's entry in Bollywood | ​ रहना है तेरे दिल में या चित्रपटाद्वारे नव्हे तर या चित्रपटाद्वारे आर माधवनने केली होती बॉलिवूडमध्ये एंट्री

​ रहना है तेरे दिल में या चित्रपटाद्वारे नव्हे तर या चित्रपटाद्वारे आर माधवनने केली होती बॉलिवूडमध्ये एंट्री

googlenewsNext
माधवनने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आजवर त्याने रहना है तेरे दिल मैं, रंग दे बसंती, थ्री इडियट्स, तन्नू वेड्स मन्नू यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तर त्याला सुपरस्टार ही पदवी मिळाली आहे. आर माधवनला आज अभिनयक्षेत्रात चांगलेच यश मिळाले असले तरी त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कारण माधवनच्या कुटुंबियातील कोणीच या क्षेत्राशी संबंधित नसल्याने या क्षेत्रात स्थिरावणे त्याच्यासाठी खूपच कठीण होते. 
आर माधवनचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म झारखंडमधील जमशेदपूर मध्ये झालेला आहे. त्याचे वडील हे टाटा स्टीलमध्ये कामाला होते तर आई बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. माधवनला आर्मीत जाण्याची इच्छा होती. पण त्याने इंजिनिअर बनावे असे त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. माधवन कॉलेज मध्ये असल्यापासून प्रचंड हुशार होता. तसेच तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस देखील घेत होता. कोल्हापूरला असताना त्याच्या एका क्लासमध्ये त्याची सरितासोबत ओळख झाली. सरिता त्याच्या क्लासमध्ये शिकायला होती. तिला एअर होस्टेस म्हणून नोकरी मिळाल्यानंतर तिने माधवनला पार्टी देण्याचे ठरवले आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली. त्यांनी पुढे जाऊन लग्न केले. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे.
आर माधवनने एका पावडरच्या जाहिरातीपासून त्याच्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मनी रत्नम यांच्या एका चित्रपटासाठी त्याने ऑडिशन दिले. पण या भूमिकेसाठी तो तितका मॅच्युअर्ड नसल्याचे त्याला सांगण्यात आले आणि त्याची ही संधी हुकली. पण काही वर्षांनी मनी रत्नम यांच्याच एका दाक्षिणात्य चित्रपटात त्याने काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. छोट्या पडद्यावर माधवनला काम करण्याची संधी कशी मिळाली हे तर खूपच रंजक आहे. अंधेरी लोखंडवालाच्या रस्त्यावरून चालत असताना त्याला एकाने टिव्ही मालिकेत काम करण्याची ऑफर दिली आणि हिंदी मालिकांमध्ये त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्याने बनेगी अपनी बात, साया, घर जमाई यांसारख्या अनेक मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. 
रहना है तेरे दिल में हा माधवनचा पहिला हिंदी चित्रपट आहे असे अनेकांना वाटते. पण त्याने याआधी एका चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. इस रात की सुबह नही या चित्रपटातील एका गाण्यात तो झळकला होता. या चित्रपटात निर्मल पांडे, स्मृती मिश्रा, आशिष विद्यार्थी यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

Also Read : शाहरुख खानच्या या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आर माधवन

Web Title: Raveena Hai Tere Dil Mein This film is not based on R. Madhavan's entry in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.