रवीना टंडनला पद्मश्री पुरस्कार जाहीर, संगीत दिग्दर्शक एम कीरावानीही पद्मश्री पुरस्काराने सम्मानित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 09:13 AM2023-01-26T09:13:43+5:302023-01-26T09:15:18+5:30
७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जवळपास १०६ जणांना पद्म पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. ६ पद्म विभूषण, ९ पद्म भूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा यात समावेश आहे. अभिनेत्री 'रविना टंडन' (Raveena Tandon) आणि आरआरआर सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याचे संगीत दिग्दर्शक 'एम कीरावानी' (MM Keerawani) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच प्रसिद्ध तबला वादक 'झाकीर हुसैन' (Zakir Hussain) यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सम्मानित करण्यात येणार आहे. तर गायिका 'वाणी जयराम' यांना 'पद्मभूषण' पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच अभिनेत्री रविना टंडन हिने आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मी कृतज्ञ आहे.केवळ फिल्म इंडस्ट्रीच नाही तर त्याहीपलीकडे जात मला योगदान देता आले, काम करता आले, सिनेमा आणि कलेप्रती माझी आवड आणि उद्दिष्ट यांची दखल घेतली गेली यासाठी मी भारत सरकारचे आभार मानते. मी नेहमीच माझ्या वडिलांची ऋणी असेन. '
Honoured & grateful. Thank you, GoI, for acknowledging my contributions, my passion & purpose - cinema & arts, that allowed me to contribute, not only to the film industry but also beyond. I owe this to my father: Actor Raveena Tandon
— ANI (@ANI) January 25, 2023
(Pic: Raveena Tandon's Instagram Handle) https://t.co/2FoXnDbz6Wpic.twitter.com/i7m0BJBg8T
रवीना टंडनने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. यामध्ये 'मोहरा', 'पत्थर के फूल', 'अंदाज अपना अपना' यासारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे. पत्थर के फूल मधूनच तिने अभिनयात पदार्पण केले होते.