Guess Who: अमिताभ यांच्या शेजारी बसलेल्या या मुलीला ओळखलंत? ९० च्या दशकात हिने बॉलिवूड गाजवलेलं...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 17:17 IST2023-04-18T17:16:10+5:302023-04-18T17:17:19+5:30
Guess Who: सेलिब्रिटी आणि त्यांच्या बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जा काही औरच. सध्या सोशल मीडियावर 90 च्या दशकातील एका टॉप अभिनेत्रीचा असाच एक बालपणीचा फोटो व्हायरल होतोय.

Guess Who: अमिताभ यांच्या शेजारी बसलेल्या या मुलीला ओळखलंत? ९० च्या दशकात हिने बॉलिवूड गाजवलेलं...!!
सेलिब्रिटी आणि त्यांच्या बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जा काही औरच. म्हणूनच सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात. अनेक सेलिब्रिटीही स्वत:हून आपले बालपणीचे फोटो शेअर करत असतात. सध्या सोशल मीडियावर 90 च्या दशकातील एका टॉप अभिनेत्रीचा असाच एक बालपणीचा फोटो व्हायरल होतोय.
फोटोत एक चिमुकली अमिताभ बच्चन यांच्या शेजारी आपल्या बाबाच्या मांडीवर बसलेली दिसतेय. या चिमुकलीने ९० चं दशक गाजवलं. बॉलिवूडमध्ये त्या काळात तिचा चांगलाच बोलबाला होता. त्याकाळच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत ती सामील होती. अक्षय कुमार, गोविंदा, अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत अनेक सुपरहिट चित्रपट देणारी ही अभिनेत्री कोण हे अद्यापही तुम्ही ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो.
तिचं नाव रवीना टंडन. 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या ॲक्शन चित्रपटाद्वारे रवीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. रवीना टंडन ही बॉलिवूड दिग्दर्शक रवी टंडन यांची मुलगी आहे. 'पत्थर के फूल' या पहिल्याच चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात रवीना टंडनसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता. पुढे रवीनाने एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. 'दिलवाले', 'मोहरा', 'खिलाडियों का खिलाडी', 'बडे मियाँ छोटे मियाँ' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. आजही ती बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. 2004 मध्ये रवीना टंडनने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत.