महाकुंभमध्ये काही पुरुषांनी बनवला कतरिना कैफचा व्हिडिओ; रवीना टंडन भडकली, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 16:05 IST2025-03-02T16:03:34+5:302025-03-02T16:05:08+5:30
'त्या' व्हिडिओवर रवीनाने जाहीरपणे व्यक्त केली नाराजी

महाकुंभमध्ये काही पुरुषांनी बनवला कतरिना कैफचा व्हिडिओ; रवीना टंडन भडकली, म्हणाली...
यंदा प्रयागराज येथील महाकुंभमध्ये शाही स्नान करण्यासाठी कोट्यवधी सामान्य नागरिकांनी हजेरी लावली. शिवाय अनेक सेलिब्रिटीही महाकुंभमध्ये सहभागी झाले होते. शेवटच्या दोन दिवसात अभिनेत्री कतरिना कैफनेही (Katrina Kaif) सासूसह महाकुंभमध्ये हजेरी लावली. कतरिनाने पाण्यात डुबकीही मारली. यावेळी तिला अनेकांनी घेराव घातला. तिचे व्हिडिओही काढले गेले जे व्हायरल झाले. हे व्हिडिओ पाहून आता अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) संताप व्यक्त केला आहे.
कतरिना कैफने त्रिवेणी संगमावर हजेरी लावत गंगेत स्नान केलं. तिने पाण्यात डुबकी मारली आणि प्रार्थना केली. तिच्या चारही बाजूला सुरक्षारक्षक होते. मात्र लोकांचीही गर्दी होती. तिचा गंगेत डुबकी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये आजूबाजूला अनेक माणसं दिसत आहेत. काही जण तिचा व्हिडिओ बनवत आहेत काही खिल्ली उडवत हसत आहेत. एकाने ये मै हू, ये मेरा भाई है आणि नंतर कॅमेरा फिरवत ये कतरिना कैफ है असा व्हिडिओ बनवला. अभिनेत्री रवीना टंडनने या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली,"हे खूपच घृणास्पद आहे. असे लोक त्या जागेचं आणि त्या क्षणाचं पावित्र्य खराब करत आहेत."
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्या पुरुषांची निंदा केली आहे. त्यांना ट्रोल केलं जात आहे. 'हे फार भयानक आहे...लोक इतके निर्लज्ज कसे आहेत?' अशी कमेंट एकाने केली आहे. किमान त्या जागेचं पावित्र्य राखत कतरिना सेलिब्रिटी असली तरी तिला तिची खाजगी स्पेस देणं गरजेचं होतं असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.