लेकीच्या आंतरधर्मीय विवाहाविषयी पहिल्यांदाच रविना व्यक्त; म्हणाली...'चर्चमध्ये लग्न ..'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 02:24 PM2023-09-29T14:24:09+5:302023-09-29T14:24:58+5:30
Raveena Tandon: रविनाने पहिल्यांदाच तिच्या दत्तक लेकीच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे.
90 च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमा देणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रविना टंडन (Raveena Tandon). उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रविनाने एक काळ गाजवला. इतकंच नाही तर आजही तिच्या अभिनयाची, खासगी आयुष्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे वयाच्या २१ वर्षी रविनाने दोन मुलींना दत्तक घेत मातृत्वाची जबाबदारी स्वीकारली. इतकंच नाही तर या मुलींना चांगलं शिक्षण, संस्कार देऊन त्यांचं थाटामाटत लग्नदेखील करुन दिलं. विशेष म्हणजे रविनाच्या थोरल्या लेकीने आंतरधर्मीय विवाह केला. या लग्नसोहळ्याविषयी रविनाने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
रविवाने तिच्या नात्यातील एका भावाच्याच मुलींना दत्तक घेतलं आहे. छाया आणि पूजा या अनुक्रमे ११ आणि ८ वर्षांच्या असताना रविनाने त्यांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रविनाने २००४ मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे अनिल यांनीही छाया आणि पूजा यांच्यावर पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम केलं.
रविनाच्या लेकीने छायाने २०१६ मध्ये गोव्यामध्ये हिंदू-कॅथलिक वेडिंग पद्धतीने लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा बराच चर्चेत राहिला. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यावर पहिल्यांदाच रविनाने तिचं मत मांडलं आहे. अलिकडेच रविनाने 'लहरें रेट्रो'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने लेकीच्या लग्नाविषयी भाष्य केलं.
'तुझा मुलीच्या आंतरधर्मीय विवाहासाठी पाठिंबा होता का?' असा प्रश्न रविनाला या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्यावर, "नक्कीच माझा पाठिंबा होता. मला या लग्नावर कोणताच आक्षेप नव्हता. छायाचा झालेला आंतरधर्मीय विवाहसोहळा अत्यंत सुंदररित्या झाला. माझ्या लेकीने वेडिंग गाऊनसोबत हातात चुडा घातला होता. मी छायाला Aisleपर्यंत घेऊन गेले. लोकांच्या मनात जे किंतू-परंतु असतं त्याला छेद द्यायची हीच वेळ होती. वेडिंग सेरेमनीमध्ये एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिल्यानंतर छायाच्या भांगेत कुंकू भरण्यात आलं. त्यानंतर चर्चमध्येच तिच्या गळ्यात मंगळसूत्रही घालण्यात आलं", असं रविना म्हणाली.
दरम्यान, या मुलाखतीमध्ये रविनाने पती अनिल थडानी आणि दत्तक मुलींचं नातं कसं आहे हेदेखील सांगितलं. ज्यावेळी माझ्या लेकींना आर्थिकबाबींमध्ये निर्णय घ्यायचा असतो त्यावेळी ते अनिलची मदत घेतात असंही रविनाने यावेळी सांगितलं.