"अक्षय आणि माझ्यात आजही....," ब्रेकअपनंतर तब्बल २२ वर्षांनी रवीना टंडनचा अभिनेत्यासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 02:02 PM2023-05-19T14:02:52+5:302023-05-19T14:05:39+5:30
रवीना अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, गुपचूप दोघांनी साखरपुडाही केला होता. यानंतर दोघंही लग्न करणार, असाच सर्वांचा अंदाज होता. पण झालं भलतंच.
नव्वदीचं दशक गाजवणारी बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडननं (Raveena Tandon) एक काळ गाजवला. एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल लाईफमधील लव्ह अफेअर्सची चर्चाही खूप झाली. ९० च्या दशकात अक्षय कुमारची इमेज आशिकची होती. रवीना टंडनचेही नाव त्याच्या प्रेयसीच्या यादीत होते. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा चित्रपटसृष्टीत रंगल्या होत्या.
‘मोहरा’ या चित्रपटात अक्षय व रवीनाची वर्णी लागली. शूटींग सुरू झालं आणि तशी दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली. दोघेही एकमेकांसोबत दिसू लागले. रवीना अक्षयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. अगदी एका पायावर अक्कीशी लग्न करायला तयार होती. त्याच्यासाठी पीक वर असलेलं करिअर सोडायलाही राजी होती. अगदी तिनं सिनेमे साईन करणंही थांबवलं होतं. कारण लग्नानंतर रवीनानं काम करू नये, अशी अक्षयची इच्छा होती. असं म्हणतात की, अक्षय व रवीनानं गुपचूप साखरपुडाही केला होता. यानंतर दोघंही लग्न करणार, असाच सर्वांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. क्षणात सगळं संपलं. यानंतर दोघांनी आपापला मार्ग बदलला. आता अक्षय कुमारबरोबर रवीनाचं नातं कसं आहे, याचा तिने स्वतः खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रवीना म्हणाली, 'अक्षय आणि माझ्यात आजही खूप चांगली मैत्री आहे. आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. प्रत्येकाचा स्वत:चा असा एक प्रवास असतो आणि आपण त्याचा मान राखून पुढे जायचं असतं. अक्षय हा आपल्या मनोरंजनसृष्टीचा भक्कम आधार आहे असं मला वाटतं.”
रवीनाशी ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने ९० च्या दशकाच्या अखेरीस ट्विंकल खन्नाशी साखरपुडा केला आणि २००१ मध्ये ते दोघं विवाहबंधनात अडकले.त्यांना दोन मुलं आहेत. तर रवीनाने बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केले आहे आणि तीदेखील दोन मुलांची आई आहे.