हातात हात घेतला, मिठी मारली अन्…,ब्रेकअपनंतर तब्बल २२ वर्षांनी पहिल्यांदाच एकत्र दिसले अक्षय कुमार-रवीना टंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 01:15 PM2023-05-08T13:15:37+5:302023-05-08T13:19:35+5:30
रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर दोघेही कोणत्याही चित्रपटात दिसले नाही.
रवीना टंडन (Raveena Tandon)आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावर दिसणार्या हास्यावरून हे स्पष्ट होते की दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत. या दोन्ही कलाकरांना दिर्घकाळानंतर एकत्र बघून चाहतेही खूप खूश आहेत.
अवॉर्ड शोमध्ये अक्षय कुमारला 'स्टाईल हॉल ऑफ फेम' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवीना टंडनने स्वतः तिच्या एक्स बॉयफ्रेंडला हा पुरस्कार दिला. तसेच रवीनाने अक्षयवर कौतुकाचा वर्षाव देखील केला. यादरम्यान दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहण्यासारखा होता.
एकेकाळी रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या अफेअर बॉलिवूडमध्ये खूप चर्चा होती. दोघांनाही लग्न करायचे होते. 'मोहरा' चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांचीही एंगेजमेंट झाली होती. मात्र हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. रवीना टंडनावर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. रवीनाने अनेकदा अक्षयवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ब्रेकअपनंतर दोघेही कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत आणि कोणत्याही फंक्शनमध्येही दिसले नाहीत. पहिल्यांदाच हे दोघे एकत्र आले आहेत.
ब्रेकअपच्या इतक्या वर्षानंतर रवीना टंडन अक्षय कुमारसोबत दिसली तेव्हा चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते खूप खूश आहेत. दोघांचे पॅचअप झाल्याचे चाहत्यांचं म्हणणे आहे. 55 वर्षांच्या अक्षयने अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आहे. त्यांना दोन मुलं आहेत. तर 48 वर्षीय रवीनाने बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केले आहे आणि तीदेखील दोन मुलांची आई आहे.