Raveena Tandon: ट्विंकल खन्नासोबत तुलना होताच रवीना टंडन म्हणाली-मोती बिंदूचं ऑपरेशन करून घे...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:39 PM2023-01-23T12:39:08+5:302023-01-23T19:41:17+5:30

अलीकडेच एका चाहत्याने रवीनाची तुलना ट्विंकलशी केली आहे, ज्याला रवीना टंडनने मजेशीर उत्तर दिले आहे.

Raveena tandon react on compared with Akshay kumar wife Twinkle khanna | Raveena Tandon: ट्विंकल खन्नासोबत तुलना होताच रवीना टंडन म्हणाली-मोती बिंदूचं ऑपरेशन करून घे...

Raveena Tandon: ट्विंकल खन्नासोबत तुलना होताच रवीना टंडन म्हणाली-मोती बिंदूचं ऑपरेशन करून घे...

googlenewsNext

Raveena Tandon on Twinkle Khanna: 90 च्या दशकातील दोन प्रसिद्ध अभिनेत्रींची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यात रवीना टंडन (Raveena Tandon) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)यांची नावे नेहमीच येतात.  त्या काळात बहुतेकांना रवीना आणि ट्विंकल एकच व्यक्ती वाटत होती, त्यामुळे लोक या दोघांना ओळखण्यात गोंधळात पडत होते. दरम्यान, अलीकडेच एका चाहत्याने रवीनाची तुलना ट्विंकलशी केली आहे, ज्याला रवीना टंडनने मजेशीर उत्तर दिले आहे.

ट्विंकल खन्नासोबत रवीना टंडनची तुलना
अभिनेत्री रवीना टंडन तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. रवीना टंडन अनेकदा आपले मत मांडताना दिसली आहे. रविवारी रवीना टंडनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर आस्क मी सेशन ठेवले, ज्याद्वारे लोकांनी रवीनाला विविध प्रश्न विचारले, ज्याला रवीना टंडनने उत्तरेही दिली. दरम्यान, एका चाहत्याने रवीना टंडनला सांगितले की, 'लहानपणी रवीना आणि ट्विंकल खन्नाबद्दल खूप गोंधळ व्हायचा'.

रवीना टंडनने मजेशीर उत्तर दिले, 'तुम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन करा, पैशांची व्यवस्था केली जाईल.' रवीना टंडनचे हे उत्तर ऐकून तुम्हालाही हसू येईल. यानंतर रवीना टंडनची पुन्हा ट्विंकल खन्नासोबत कोणीही तुलना करणार नाही.


रवीना टंडन गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या साऊथ सिनेमाचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF Chapter 2' (KGF 2) मध्ये झळकली होती. साऊथ सुपरस्टार यशच्या या चित्रपटात रवीना टंडनने रमिका सेन या व्यक्तिरेखेने चाहत्यांची मनं जिंकली. 
 

Web Title: Raveena tandon react on compared with Akshay kumar wife Twinkle khanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.