"राजकारणात आले तर मला गोळी मारतील", असं का म्हणाली रवीना टंडन? सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:39 IST2024-11-21T10:39:05+5:302024-11-21T10:39:49+5:30
रवीनाने एकदा एका मुलाखतीत राजकारणात न येण्याचं कारण सांगितलं होतं.

"राजकारणात आले तर मला गोळी मारतील", असं का म्हणाली रवीना टंडन? सांगितलं कारण
रवीना टंडन (Raveena Tandon) ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. अक्षय कुमार, गोविंदासोबत तिचे अनेक सिनेमे गाजले. नंतर फिल्ममेकर अनिल थडानीसोबत तिने लग्न केलं. रवीनाकधीच राजकारणात का आली नाही याचं उत्तर तिने एका मुलाखतीत दिलं होतं. तिला अनेकदा राजकारणातील एन्ट्रीची ऑफरही आली होती मात्र तिने प्रत्येकवेळी नकार दिला. काय म्हणाली रवीना?
रवीना टंडनची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यामध्ये तिने अनेकदा राजकारणाची ऑफर आल्याचा खुलासा केला. मात्र नकाराचं कारण सांगत ती म्हणाली, "मी प्रामाणिक आहे आणि चुकीची कामं सहन करु शकत नाही. याच सवयींमुळे मी कधी राजकारणात उतरले नाही. मी ज्या दिवशी राजकारणात येईन त्या दिवशी माझ्या या सवयींमुळे मला कोणीही गोळी मारतील."
तू पुढे म्हणाली, "मी सत्याला खोट्यामध्ये बदलू शकत नाही. माझ्यासाठी हे कठीण होऊन बसतं कारण जे मला आवडत नाही ते माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसतं. मग मी त्यासाठी लढते. आजच्या काळात कदाचित प्रामाणिक असणं फार चांगलं नाहीए. त्यामुळे जेव्हा कोणी मला राजकारणात ये असं सांगतं तेव्हा मी म्हणते की मी आले तर लवकरच माझी हत्या होईल."
रवीना टंडनने ही मुलाखत २०२२ मध्ये दिली होती. यात ती असंही म्हणाली की, "एक वेळ अशी आली होती जेव्हा मी खरोखरंच राजकारणात यायचा विचार केला. पश्चिम बंगाल, मुंबई आणि पंजाबसह अनेक राज्यांतून मला जागा ऑफर झाल्या होत्या. पण मी हो म्हणू शकले नाही."