'या' भारतीय क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय रवीना टंडनच्या लेकीचं नाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:21 PM2024-12-04T13:21:09+5:302024-12-04T13:21:38+5:30
भिनेत्री रवीना टंडनच्या लाडक्या लेकीचं नाव एका भारतीय क्रिकेटपटूबरोबर जोडलं जात आहे.
Kuldeep Yadav And Rasha Thadani Dating : क्रिकेट आणि बॉलिवूडचे लव्ह कनेक्शन जुने आहे. क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधल्या अभिनेत्री यांच्या अफेअर्सच्या चर्चा अनेकदा ऐकल्या आहेत. काहींची नाही फक्त डेटिंगपुरती राहतात, तर काहींचं नात लग्नापर्यंत पोहचलं आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. यात मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ते विराट कोहली- अनुष्का शर्मापर्यंत. आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या लाडक्या लेकीचं नावही एका भारतीय क्रिकेटपटूबरोबर जोडलं जात आहे. या दोघांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
रवीना टंडनची लेक राशा थडानी ही एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. तो क्रिकेटपटू कुलदीप यादव आहे. सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर कुलदीप आणि राशा एकमेकांना फॉलो देखील करतात. शिवाय, तिच्या सर्व फोटोंना कुलदीपनं लाइक केल्याचं दिसतंय. पण, चर्चांवर राशा किंवा कुलदीप याने अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघांनी देखील यावर मौन बाळगलं आहे.
राशा ही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण आहे. अजय देवगणबरोबर तिचा एक नवीन सिनेमा येणार आहे. या चित्रपटाने नाव आझाद असे आहे. तर कुलदीप हा दुखापत झाल्याने सध्याच्या घडीला भारतीय संघात नाही. तो उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेला होता. पण आता कुलदीप दुखापतीमधून सावरला आहे आणि तो लवकरच भारतीय संघात दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.