​रवीना टंडनच्या ‘मातृ’वर सेन्सॉर बोर्ड नाराज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2017 09:10 AM2017-04-17T09:10:12+5:302017-04-17T14:40:12+5:30

अभिनेत्री रवीना टंडन ‘मातृ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार वापसी करण्यास सज्ज आहे.  रवीनाचा ‘मातृ’मधील अभिनय पाहायला लोक उत्सूक आहेत. ...

Raveena Tandon's 'Mother' angry sensor board! | ​रवीना टंडनच्या ‘मातृ’वर सेन्सॉर बोर्ड नाराज!

​रवीना टंडनच्या ‘मातृ’वर सेन्सॉर बोर्ड नाराज!

googlenewsNext
िनेत्री रवीना टंडन ‘मातृ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार वापसी करण्यास सज्ज आहे.  रवीनाचा ‘मातृ’मधील अभिनय पाहायला लोक उत्सूक आहेत. पण सेन्सॉर बोर्डाला कदाचित हा चित्रपट रूचलेला नाही. होय, मेकर्सने सेन्सॉर बोर्डासाठी ‘मातृ’चे स्क्रिनिंग ठेवले होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिनिंग सुरु झाले आणि उण्यापुºया दहा मिनिटांतच बोर्डाचे सदस्य उठून चालते झाले. या चित्रपटाबद्दल बोर्डाला योग्य माहिती दिली गेली नव्हती, असे या सदस्यांचे म्हणणे आहे. बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी आणि त्यांच्या टीमसाठी हे स्क्रीनिंग ठेवले गेले होते.
सेन्सॉर बोर्डाच्या मते, चित्रपटाची कथा काही वेगळीच होती आणि प्रत्यक्ष चित्रपट पाहताना वेगळीच कथा पडद्यावर दिसली. ‘मातृ’चे निर्माते अंजुम रिजवी यांना याबाबत छेडले असता, त्यांनी या वृत्ताचा इन्कार केला. काही तांत्रिक कारणामुळे सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी स्क्रिनिंग बंद केले. ते लवकरच पुन्हा चित्रपट बघतील, असे त्यांनी सांगितले.

ALSO READ : रवीना टंडन म्हणते, ट्विंकल माझी चांगली मैत्रिण!

‘मातृ’मध्ये देशातील व्यवस्थेविरोधात एक लढाई दाखवली आहे. येत्या २१ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. ही कथा मायकल पैलिकोने लिहिली असून अश्तर सईदने दिग्दर्शित केली आहे.  या चित्रपटाची कथा पूर्णत: बलात्कार आणि घरगुती हिंसा या विषयावर आधारित आहे. चित्रपटात रवीना एका नोकरदार महिलेची भूमिका साकारत आहे. मुलीचे आयुष्य खराब करणाºया गुन्हेगारांविरूद्ध ती लढा देण्याचा निर्णय घेते. पण या लढाईत रवीना एकाकी पडते. पती, प्रशासन आणि समाज सगळेच रवीनाला मदत करण्यास नकार देतात. सगळे काही विसर आणि पुढे जा, असा सल्ला तिला सगळ्यांकडून मिळतो. पण रवीना हा सल्ला झिडकारते आणि एकटीने हा लढा लढण्याचा निर्णय घेते.

Web Title: Raveena Tandon's 'Mother' angry sensor board!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.