अंदाज अपना अपनाच्या सेटवर मस्करीत रवीनावर आमिरने सांडवला होता चहा, तिने घेतला होता असा बदला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 02:06 PM2019-04-26T14:06:16+5:302019-04-26T14:07:24+5:30

अंदाज अपना अपना या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही.

Raveena Tandon’s savage prank on Amir Khan on Andaz Apna Apna set revealed on Super Dancer Chapter 3 | अंदाज अपना अपनाच्या सेटवर मस्करीत रवीनावर आमिरने सांडवला होता चहा, तिने घेतला होता असा बदला

अंदाज अपना अपनाच्या सेटवर मस्करीत रवीनावर आमिरने सांडवला होता चहा, तिने घेतला होता असा बदला

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘ए लो जी सनम हम आ गए’ या गाण्याचे शूटिंग जंगलात होणार होते. त्यावेळी मी नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांच्या मदतीने आमिर खानची थट्टा करायची योजना आखली. आम्ही कॅमेर्‍यात रीळ न घालताच आमिर खानला तीन तास सतत नृत्य करायला लावले होते.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लहान मुलांचा नृत्य रियालिटी शो सुपर डान्सर पर्व 3 च्या आगामी एपिसोडमध्ये रवीना टंडन अतिथी परिक्षक म्हणून हजेरी लावणार आहे. या शो च्या सेटवर स्पर्धकांनी त्यांच्या गुरूंबरोबर तिच्या प्रसिद्ध गाण्यांवर केलेले सादरीकरण पाहून ती प्रचंड खूश झाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत असून या कार्यक्रमाचा टीआरपी नेहमीच चांगला असतो. 

नऊ वर्षीय तेजस हा चांगला डान्सर असण्यासोबतच सेटवरील अत्यंत खोडकर मुलगा असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. जेव्हा तेजस त्याच्या खोडकर किस्स्यांबाबत रवीनाला अभिमानाने सांगत होता. तेव्हा तिने अंदाज अपना अपना या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सुपरस्टार आमिर खानची कशी थट्टा केली होती हे सगळ्यांना सांगितले.
 


अंदाज अपना अपना या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटातील अमर, प्रेम हे आजही प्रेक्षकांचे तितकेच लाडके आहेत. या चित्रपटातील गोगो, भल्ला, करिश्मा, रवीना, रॉबर्ट, तेजा या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या चित्रपटात सलमान खान, आमिर खान, रवीना टंडन, करिश्मा कपूर, शक्ती कपूर, परेश रावल यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाला आता जवळजवळ 30 वर्षं झाली आहेत. हा चित्रपट बॉलीवुडमधील अनेक उत्कृष्ट विनोदी चित्रपटांपैकी एक मानला जातो. 

या चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या एका किस्स्याविषयी रवीना सांगते, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान खोड्या करणे हा एक रिवाजच झाला होता. आमिरने एकदा मस्तीत चक्क माझ्या अंगावर गरम चहा सांडवला होता. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते. पण हे सहज सोडून न देता त्याचा बदला घेण्याचे मी ठरवले आणि अखेर मी यात यशस्वी ठरले. ‘ए लो जी सनम हम आ गए’ या गाण्याचे शूटिंग जंगलात होणार होते. त्यावेळी मी नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांच्या मदतीने आमिर खानची थट्टा करायची योजना आखली. आम्ही कॅमेर्‍यात रीळ न घालताच आमिर खानला तीन तास सतत नृत्य करायला लावले होते. हे कळल्यानंतर सेटवर सगळेच प्रचंड हसले होते.


 
‘सुपर डान्सर पर्व 3’ या कार्यक्रमाचा हा भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.

Web Title: Raveena Tandon’s savage prank on Amir Khan on Andaz Apna Apna set revealed on Super Dancer Chapter 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.