कपड्यांमुळे रवीना टंडनने नाकारला होता किंग खानबरोबरचा सिनेमा, म्हणाली- "तसे कपडे घालून मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 17:43 IST2024-08-10T17:42:14+5:302024-08-10T17:43:21+5:30
अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या रवीना टंडनने एका सिनेमाला कपड्यांमुळे नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने याबाबत भाष्य करत हा किस्सा सांगितला.

कपड्यांमुळे रवीना टंडनने नाकारला होता किंग खानबरोबरचा सिनेमा, म्हणाली- "तसे कपडे घालून मला..."
९०चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रवीना टंडन. अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली होती. ५०च्या उंबरठ्यावर असलेल्या रवीनाचं सौंदर्य आजही तरुण अभिनेत्रींना लाजवेल असंच आहे. दिलवाले, अंदाज अपना अपना, मोहरा, लाडला, बडे मियां छोटे मियां अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पण, एका सिनेमाला तिने कपड्यांमुळे नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवीनाने याबाबत भाष्य करत हा किस्सा सांगितला.
रवीना टंडनलाशाहरुख खानबरोबरच्या सिनेमात काम करण्याची ऑफर होती. पण, कपड्यांमुळे या सिनेमाला तिला नकार द्यावा लागला. फिल्मफोअरला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने हा किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, "या सिनेमात मला शाहरुखबरोबर काम करायचं होतं. सिनेमातील कॉस्ट्यूमवर चर्चा होईपर्यंत या सिनेमासाठी होकार देण्याच्या तयारीत मी होते. पण, कॉस्ट्यूम खरंच वेगळेच होते. त्या कॉस्ट्यूममध्ये मला कम्फर्टेबल वाटलं नसतं. यांना काहीतरी वेगळंच करायचं होतं. म्हणून मी त्यांना म्हणाले की मला माफ करा, पण हा सिनेमा मी नाही करू शकत". यानंतर रवीनाने शाहरुखबरोबरही यावर चर्चा केली होती.
पुढे ती म्हणाली, "शाहरुख मला म्हणाला की तू वेडी आहेस का? आपण चांगलं म्युझिक असलेला जादू सिनेमा करत आहोत. जमाना दीवानामध्येही काम करत आहोत. शाहरुख आणि माझी चांगली मैत्री होती. शाहरुख हा सगळ्यात बुद्धिमान आणि सज्जन सहकलाकारांपैकी एक आहे. मी त्याला म्हणाले की तसे कपडे मी नाही घालू शकत. मला कम्फर्टेबल वाटणार नाही."
रवीना आणि शाहरुखने ये लम्हे जुदाई के, जादू, जमाना दीवाना, पहला नशा या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. तिला शाहरुखचा डर सिनेमाही ऑफर करण्यात आला होता. पण, काही सीन्समुळे तिने या सिनेमालाही नकार दिला. नंतर डर सिनेमात रवीनाऐवजी जुही चावला दिसली.