रवीना टंडनच्या लेकीचं लवकरच अभिनयात पदार्पण, साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत झळकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:06 AM2023-10-02T10:06:14+5:302023-10-02T10:07:04+5:30
डेब्यूआधीच राशा थडानीचा मोठा चाहतावर्ग तयार झालाय.
बॉलिवूडमधील स्टारकिड्सच्या चर्चांमध्ये आणखी एका स्टारकिडचं नाव आलं आहे. ती म्हणजे रवीना टंडनची (Raveena Tondon) लेक राशा थडानी (Rasha Thadani). सुंदर एअरपोर्ट लुक्सने राशाने आधीच चाहत्यांना घायाळ केलंय. राशा आई रवीना प्रमाणेच खूप सुंदर आहे. नुकतंच तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असून ती अभिनयात पदार्पण करण्यासाठी तयारी करत आहे. इतकंच नाही तर 'RRR' फेम अभिनेता रामचरणच्या (Ram charan) सिनेमातून राशा डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत.
'ओटीटी प्ले' रिपोर्टनुसार, राशा थडानी लवकरच तेलुगू सिनेमातून अभिनयाला सुरुवात करेल. साऊथ सुपरस्टार रामचरणसोबत ती आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करु शकते. ती या सिनेमासाठी अतिशय योग्य असल्याने तिची निवड झाल्याची चर्चा आहे. मेकर्स लवकरच तिला साईन करु शकतात. मात्र अद्याप या चर्चांवर अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ना राशाने आणि ना रामचरणने यावर काहीच शेअर केलेलं नाही. काही दिवसांपूर्वी अशाही चर्चा होत्या की राशा अजय देवगणची बहीण नीलमचा मुलगा अमन देवगणसोबत बॉलिवूड डेब्यू करु शकते. अभिषेक कपूरच्या एक्शन एडव्हेंचर फिल्ममध्ये या दोघांची जोडी असण्याची शक्यता आहे. मात्र याबद्दलही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लेकीच्या डेब्यूसंदर्भात अभिनेत्री रवीना म्हणाली होती की, 'सध्या राशा शिक्षण पूर्ण करत आहे त्यानंतरच ती अभिनयात पदार्पणाचा विचार करेल. तसंच कंफर्टेबल असेल तर ती फिल्ममध्ये किसींग सीन्स देऊ शकते. मात्र तिला करायचं नसेल तर कोणीही तिच्यावर जबरदस्ती करु शकत नाही.'
राशा अनेकदा पार्टी, एअरपोर्ट, किंवा आईसोबत लंच, डिनर अशा ठिकाणी दिसत असते. अनेक स्टारकिड्समध्ये राशा मात्र आधीपासूनच खूप आत्मविश्वासू वाटते. पापाराझींसमोर ती नेहमी कॉन्फिडंट असते. तिच्या लुक्स आणि सौंदर्याने डेब्यूआधीच तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.