Agnipath Scheme: रवी किशन यांच्या लेकीची ‘अग्निपथ’मध्ये भरती होण्याची इच्छा, लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:41 PM2022-06-16T16:41:16+5:302022-06-16T16:43:44+5:30

Agnipath Scheme, Ravi Kishan : सध्या ‘अग्निपथ’वरून देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात भोजपुरी स्टार व भाजपा नेते रवी किशन यांची लेक इशिता शुक्ला हिने ‘अग्निपथ’ योजनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Ravi Kishan Daughter Ishita Wants To Be In Agnipath Recruitment Scheme users Replied | Agnipath Scheme: रवी किशन यांच्या लेकीची ‘अग्निपथ’मध्ये भरती होण्याची इच्छा, लोक म्हणाले...

Agnipath Scheme: रवी किशन यांच्या लेकीची ‘अग्निपथ’मध्ये भरती होण्याची इच्छा, लोक म्हणाले...

googlenewsNext

केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि वायुदलातील सैनिक भरतीसाठी ‘अग्निपथ’ (Agnipath Scheme) नावाची योजना आणली आहे. या योजनेंतर्गत युवकांना संरक्षण दलांत चार वर्षे ‘अग्निवीर’ म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे. पण सध्या ‘अग्निपथ’वरून देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. केंद्राच्या योजनेला देशातील वेगवेगळ्या भागातून विरोध होत आहे. बिहार व अन्य राज्यांत या योजनेविरोधात जोरदार निदर्शने केली जात असून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. अशात भोजपुरी स्टार व भाजपा नेते रवी किशन (Ravi Kishan ) यांची लेक इशिता शुक्ला हिने ‘अग्निपथ’ योजनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, इशितच्या बाबांनी अर्थात रवी किशन यांनी ‘गो अहेड’ म्हणत तिला लगेच परवानगी सुद्धा दिली आहे. रवी किशन यांनी याबद्दलची एक पोस्ट शेअर केली. आता त्यांच्या पोस्टवर नेटकरी रिअ‍ॅक्ट करणार नसतील तर नवल! रवी किशन यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक कमेंट्स केल्यात. 

‘अग्निपथ’ योजनेला पाठींबा दर्शवत रवी किशन यांनी मुलीचा एनसीसी ड्रेसमधला एक फोटो पोस्ट केला. ‘बाबा, मला अग्निपथ योजनेत भरती व्हायचं आहे, असं आज सकाळी माझी मुलगी इशिता शुक्ला मला म्हणाली. यावर, बिल्कुल... आगे बढो...,असं मी तिला म्हणालो,’असं त्यांनी या फोटोसोबत लिहिलं.

रवी किशन यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
रवी किशन यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लगेच रिअ‍ॅक्ट केलं. त्यांच्या या पोस्टवर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. ‘बिटिया को रिटायरमेंट की चिंता नहीं है, बाप के पास बहुत पैसा है,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘थोड्याच दिवसांत कळेल की पापा की परी विदेशात शिकायला गेली. कारण 99 टक्के नेत्यांची मुलं विदेशात शिकत आहेत. मग पापाची ही परी मागे का राहिल?,’ अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे.
 

Web Title: Ravi Kishan Daughter Ishita Wants To Be In Agnipath Recruitment Scheme users Replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.