रवी किशन यांची DNA चाचणी? मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या शिनोवाने केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:25 AM2024-04-19T09:25:56+5:302024-04-19T09:27:00+5:30
लोकसभा निवडणूकीत गोरखपूर मतदारसंघातून उभे राहिलेले रवी किशन अडचणीत सापडले आहेत.
अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) भोजपुरी सिनेमातील दिग्गज आहेत. शिवाय ते आगामी लोकसभा निवडणूकही लढवणार आहे. गोरखपूर मतदारसंघातून त्यांना भाजपाकडून तिकीट मिळाले आहे. मात्र त्याआधीच रवी किशन अडचणीत सापडले आहेत. एका महिलेने त्यांची पत्नी असल्याचा दावा केला असून त्यांना मुलगी असल्याचाही खुलासा केला आहे. शिवाय आता रवी किशन यांच्या कथित मुलीने त्यांच्या DNA चाचणीची मागणी केली आहे.
अपर्णा ठाकूर या महिलेने काहीदिवसांपूर्वीच रवी किशन आपले पती असल्याचा दावा केला. त्यांना 25 वर्षांची शिनोवा ही लेकही आहे. रवी किशन यांनी लेकीची जबाबदारी झटकली असून तिला तिचा हक्कही मिळत नाही असा आरोप तिने केला. रवी किशन यांची पत्नी प्रीति शुक्लाने या महिलेविरोधात काल पोलिसात तक्रार दाखल केली. आता कथित मुलगी शिनोवा समोर आली असून तिने रवी किशन यांची DNA चाचणी करण्याची मागणी केली. 'आजतक'शी बोलताना शिनोवा म्हणाली, "जर आम्ही बोलतोय ते खोटं असेल तर तुम्ही समोर या आणि डीएनए चाचणी करा. तुम्ही गप्प आहात आणि कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही आहात. माझं कुटुंब, एक वकील आणि अगदी पत्रकाराविरोधातही FIR दाखल करण्यात येत आहे. आम्ही पैशांसाठी हे करत आहोत असे खोटे आरोप आमच्यावर लावण्यात येत आहेत."
BJP MP Ravi Kishan's daughter is requesting Yogi Adityanath for a one is to one meeting so that she can show proof of being the real daughter of the BJP MP Ravi Kishan.pic.twitter.com/8T1EbUsCri
— Ravinder Kapur. (@RavinderKapur2) April 16, 2024
ती पुढे म्हणाली, "ते माझे वडील आहेत आणि त्यांनी माझा स्वीकार करावा. आज मी हे अचानक सांगत नाहीए. यादरम्यानही खूप गोष्टी घडल्या आहेत. पण मी त्याविषयी जास्त बोलणार नाही. मलाच नाही तर माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. आम्ही कित्येक गोष्टींचा एकाच वेळी सामना करत आहोत."
तर दुसरीकडे रवी किशन यांची पत्नी प्रीती शुक्ला यांनी महिलेविरोधात तक्रार दाखल केली. अपर्णा ठाकूरने प्रीती यांना अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची धमकी दिली. तसंच माझं ऐकलं नाही तर तुझ्या पतीला बलात्कार प्रकरणातही फसवेन अशीही धमकी दिली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.