मन:शांतीसाठी रवि किशनने घरी केले हवन; म्हणे,‘सर्व मिळून महामारीवर विजय मिळवू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 07:03 PM2020-04-26T19:03:08+5:302020-04-26T19:03:46+5:30

कोरोनाच्या विचारांपासून दूर राहण्यासाठी सेलिब्रिटी वेगवेगळे पर्याय अवलंबत आहेत. काही ध्यानधारणा तर काही योगा, प्राणायाम करून मन:शांतीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भोजपुरी अभिनेता रवि किशनने त्याच्या मुंबईतील घरी हवन करून मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न केला.

Ravi Kishan performed Havan at home for peace of mind; Say, 'Let's all fight the epidemic together' | मन:शांतीसाठी रवि किशनने घरी केले हवन; म्हणे,‘सर्व मिळून महामारीवर विजय मिळवू’

मन:शांतीसाठी रवि किशनने घरी केले हवन; म्हणे,‘सर्व मिळून महामारीवर विजय मिळवू’

googlenewsNext

बॉलिवूडसोबतच टॉलिवूड आणि भोजपुरी या सर्वच क्षेत्रातील कलाकार कोरोनापासून सुटका मिळवण्यासाठी घरी राहून लॉकडाऊनला पाठिंबा देत आहेत. स्वत:सोबतच कुटुंबाचीही काळजी घेत आहेत. कोरोनाच्या विचारांपासून दूर राहण्यासाठी सेलिब्रिटी वेगवेगळे पर्याय अवलंबत आहेत. काही ध्यानधारणा तर काही योगा, प्राणायाम करून मन:शांतीसाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, भोजपुरी अभिनेता रवि किशनने त्याच्या मुंबईतील घरी हवन करून मन:शांती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याने वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून चाहत्यांकडून वाहवा मिळवली. त्यासोबतच सर्वजण एकत्र येऊन या महामारीवर विजय मिळवू, असा संदेशही दिला.

रवि किशन हा त्याच्या चाहत्यांसोबत वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओंसह सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याने शेअर केलेल्या नुकत्याच काही फोटोत आणि व्हिडीओत तो हवन करताना दिसतो आहे. त्याने केशरी रंगाचे धोतर नेसले असून कपाळावरही कुंकवाचा टिळा लावलेला आहे. एका फोटोत ध्यान लावून बसलेला दिसतोय तर एका फोटोत तो शंख वाजवताना दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि समाधान आपण पाहू शकतो. 

हे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शन लिहिले आहे की,‘आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे विश्वाच्या सुख, समाधान आणि शांतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. अक्षयतृतीयानिमित्ताने कोरोना या वैश्विक महामारीपासून सुटका करून घेण्यासाठी मी आज घरी हवन केले आहे. आपण सर्वांनी मिळून यातून मार्ग काढू, तसेच या आजारावर नक्कीच विजय मिळवू,’ असा संदेश त्याने दिला आहे. 

Web Title: Ravi Kishan performed Havan at home for peace of mind; Say, 'Let's all fight the epidemic together'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.