सलमानचा शेरा नाहीतर 'हा' आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा बॉडीगार्ड; महिन्याचा पगार ऐकून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 18:17 IST2024-10-28T18:14:48+5:302024-10-28T18:17:33+5:30
बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्डची गरज भासतेच.

सलमानचा शेरा नाहीतर 'हा' आहे बॉलिवूडचा सर्वात महागडा बॉडीगार्ड; महिन्याचा पगार ऐकून व्हाल थक्क
Bollywood Highest Paid Bodyguard:बॉलिवूड कलाकारांना त्यांच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्डची गरज भासतेच. कोणत्याही ठिकाणी जात असताना त्यांच्या सुरक्षेची पूर्णपणे जबाबदारी हे बॉडीगार्ड घेत असतात. दरम्यान, बॉलिवूड इंडस्ट्रीतील सलमान खानचा (Salman Khan) बॉडीगार्ड शेरा अनेकांना माहित आहे. यावरून शेरा हा सलमानच्या सुरक्षेसाठी तगडे मानधन घेत असावा, असा अनेकांचा अंदाज आहे. अशातच बॉलिवूडमधील सर्वात महागड्या बॉडीगार्डचं नाव समोर आलं आहे.
बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बॉडीगार्ड रवी सिंग इंडस्ट्रीतील सर्वाधिक महागडा बॉडीगार्ड असल्याचं सांगण्यात येतं. त्याचा वर्षाचा पगार जवळपास कोटींच्या घरात आहे. गेल्या १० वर्षापासून शाहरुखच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर आहे. शाहरुख कुठेही गेला तरी त्याचा अंगरक्षक अगदी सावलीप्रमाणे सोबत असतो. बॉडीगार्ड रवी सिंग २४ तास अभिनेत्यासोबत पाहायला मिळतो. शाहरुख व्यतिरिक्त, तो अभिनेत्याच्या कुटुंबालाही तो सुरक्षा पुरवतो. अनेकदा रवी सिंग सुहाना, अबराम आणि आर्यन खानसोबत स्पॉट झाला आहे.
किती आहे शाहरुखच्या बॉडीगार्डचा पगार
मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या बॉडीगार्डचा महिन्याचा पगार जवळपास २५ लाख इतका आहे. वर्षभरात रवी सिंग ३ कोटी रुपये कमावतो.