कोणी विकले सोने, तर कोणी गुडघ्यावर सर केल्या मंदिराच्या पायऱ्या, वाचा रजनीकांत यांच्या चाहत्यांचे किस्से!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 01:20 PM2017-12-31T13:20:37+5:302017-12-31T18:52:29+5:30

सुपरस्टार रजनीकांत यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी (३१ डिसेंबर) नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. रजनीकांत यांच्या ...

Read the steps of the temple, the gold coins sold by someone, and the stories of fans of Rajinikanth. | कोणी विकले सोने, तर कोणी गुडघ्यावर सर केल्या मंदिराच्या पायऱ्या, वाचा रजनीकांत यांच्या चाहत्यांचे किस्से!

कोणी विकले सोने, तर कोणी गुडघ्यावर सर केल्या मंदिराच्या पायऱ्या, वाचा रजनीकांत यांच्या चाहत्यांचे किस्से!

googlenewsNext
परस्टार रजनीकांत यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारी (३१ डिसेंबर) नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. रजनीकांत यांच्या घोषणेमुळे दक्षिणेच्या राजकारणात खळबळ उडाली असेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण रजनीकांत यांची लोकप्रियता पाहता अनेक बड्या राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, नव्या पक्षाची घोषणा करताना रजनीकांत यांनी म्हटले की, ‘तामिळनाडूमध्ये होणाºया आगामी विधानसभेच्या निवडणुकीअगोदरच मी पक्ष स्थापन करणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुका या अतिशय रंजक होतील यात शंका नाही. कारण रजनीकांत यांचे आत्ताचे स्थान पाहता ते या निवडणुकीत जबरदस्त धडक मारतील असेच दिसून येत आहे. वास्तविक रजनीकांत यांना हे स्थान त्यांच्या चाहत्यांमुळे प्राप्त झाले आहे. कारण त्यांच्या चाहत्यांची त्यांच्याप्रती असलेली ओढ थक्क करणारी आहे. बºयाच चाहत्यांनी त्यांना देवाचा दर्जा मिळवून दिला आहे. याविषयीचे काही किस्से आम्ही तुम्हाला या स्पेशल रिपोर्टमधून सांगणार आहोत. 



रजनीकांत यांचा गोपी नावाचा चाहता साउथमध्ये रजनीकांत यांच्याप्रती त्याच्या मनात असलेल्या आदरामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. गोपी, रजनीकांत यांचा प्रत्येक चित्रपट रिलीजच्या दिवशीच त्याच्या शहरातील एक हजार गरिबांना चेन्नई येथे आणून चित्रपट दाखवितो. त्याच्या मते, रजनीकांत परमेश्वर आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून गोपी एक हजार लोकांना रजनीकांत यांचा चित्रपट दाखवित असल्याने त्याच्यावर लाखो रूपयांचे कर्जही झाले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्याला सुरवातीला पत्नीचे दागिने विकावे लागले. त्यानंतर त्याने घरही विकून टाकले आहे. 



चेन्नईमधील एका दुकानाचे मालक एन. रवि आणि त्यांचा भाऊ एन. मरूगन रजनी यांचे प्रचंड मोठे चाहते आहेत. एकदा रजनीकांत यांचा चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून त्यांनी लक्ष्मी नरसिम्हा मंदिराच्या १५०० पायºया गुडघ्यावर चढल्या होत्या. मुरूगन रजनीकांत यांचा प्रत्येक चित्रपट बघतो, हे विशेष. 

रजनीकांत जेव्हा कंडक्टर होते, तेव्हा रवि अन्ना त्यांचे सहकारी होते. रवि सध्या चेन्नई येथे आॅटोरिक्षा चालवितात. चेन्नईमध्ये ते रजनीचा कुठलाही चित्रपट असो फर्स्ट डे फर्स्ट शो बघतात. तसेच त्यादिवसापासून पुढील सात दिवस आॅटोमध्ये बसणाºया प्रत्येक प्रवाशाला मोफत सेवा देतात. 



मुरुगन रजनीकांत यांच्या एका फॅन्स असोसिएशनशी जोडले आहेत. रजनीकांत यांचा जेव्हा-जेव्हा चित्रपट रिलीज होतो तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन परिवारासह तो चित्रपट बघतात. रजनीकांत यांचा जेव्हा ‘कबाली’ रिलीज झाला तेव्हा रजनीच्या घराचे बांधकाम केले जात होते, तर रजनीकांत अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे होते. अशात मुरुगन यांनी सोने गहाण ठेवून अमेरिका गाठली. जेणेकरून रजनी त्यांच्या परिवारासह ‘कबाली’चा फर्स्ट शो बघू शकतील. 

Web Title: Read the steps of the temple, the gold coins sold by someone, and the stories of fans of Rajinikanth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.