टायगर श्रॉफने रेडीटूमुव्ह पिढीसाठी 'प्राऊल' अँथम केले लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:27 PM2018-08-24T16:27:33+5:302018-08-24T16:29:57+5:30
अमाल मलिक द्वारा संगीतबद्ध, आणि अरमान मलिक या युथ आयकॉनने गायलेला आणि उत्साहाने सळसळणारा हा व्हिडिओ भारताची आघाडीची संगीत कंपनी टी-सिरीजने सादर केला आहे.
टायगर श्रॉफ आणि मोजोस्टार यांनी एकत्रित निर्मिलेल्या प्राऊल या या लाइफस्टाइल ब्रॅंडने अलीकडेच प्राऊल अँथम लॉन्च केले. प्राऊल अँथम #रेडीटूमुव्ह या ब्रॅंडच्या वचनाभोवती फिरते आणि हे भारतातील तरुण आणि सक्रिय पिढीसाठी सादर करण्यात आले आहे. आपल्या शारीरिक हालचाली व चपळतेच्या आगळ्यावेगळ्या आणि स्वच्छंद अभिव्यक्तीमार्फत हे अँथम अत्यंत सक्रिय जीवनशैलीचा पुरस्कार करते व तरुणांना आपले फिटनेसचे ध्येय प्राप्त करण्याच्या प्रयत्नांत अशीच जीवनशैली अंगिकारण्याचा आग्रह करते. अमाल मलिक द्वारा संगीतबद्ध, आणि अरमान मलिक या युथ आयकॉनने गायलेला आणि उत्साहाने सळसळणारा हा व्हिडिओ भारताची आघाडीची संगीत कंपनी टी-सिरीजने सादर केला आहे.
प्राऊल अँथममध्ये टायगर श्रॉफने प्राऊल अॅक्टिव्हवेअरमध्ये आपले विलक्षण शारीरिक कौशल्य प्रदर्शित केले आहे आणि आकर्षक ठेक्यावर अद्भुत नृत्य करून प्रेक्षकांना अचंबित केले आहे. गीताच्या बोलांमध्ये आजच्या तरुणांची आव्हान-केंद्री मनोवृत्ती दिसते. हा ब्रॅंड व्हिडिओ देशभरातील स्टाइल आणि फिटनेस-वेड्या उपभोक्त्यांना सतत आपल्या क्षमता जोखण्याचा आणि प्रयत्नशील राहून पुढे पुढे जाण्याचा आग्रह करतो.
लॉन्चप्रसंगी टायगर श्रॉफ म्हणाला, “प्राऊलचा जन्म, आजच्या रेडी-टू-मुव्ह पिढीच्या विशिष्ट गरजांभोवती फिरणारा सक्रिय जीवनशैली ब्रॅंड तयार करण्याच्या माझ्या आकांक्षेतून झाला आहे. आणि या ब्रॅंडच्या गीतातून आम्हाला सक्रिय जीवनशैलीचा प्रचार करायचा होता. प्राऊल गीतात, रोमांचक आणि उत्तेजित व्हिडिओमध्ये ब्रॅंडची ऊर्जा आणि तरलता अचूकपणे काबिज झाली आहे.अमाल मलिकचे संगीत देखील प्राऊल च्या तीव्रतेस आणि ऊर्जेस पूरक आहे. मला हा विश्वास वाटतो की,प्राऊल गीतामुळे भारतभरातील फिटनेस आणि स्टाइल बाबत जागरूक असणा-या तरुणांना शारीरिक दृष्ट्या अधिक सक्रिय राहण्याची प्रेरणा मिळेल."
मोजोस्टारचे व्यवस्थापकीय संचालक जिगी जॉर्ज म्हणाले, “जेव्हापासून प्राऊल ब्रॅंड लॉन्च केला आहे तेव्हापासून त्याला मिळत असलेला प्रतिसाद अद्भुत आहे. मार्केट रिलीज पूर्वी प्राऊल गीताच्या लॉन्चिंगमुळे या ब्रॅंडच्या शैलीदार अॅक्टिव्ह-वेअरभोवतीचे कुतुहल नक्कीच आणखी वाढेल. त्यात असे दर्शविले आहे की,प्राऊल शृंखला कशी फॅशन स्टेटमेंट तयार करण्यासाठी निर्मिली आहे तसेच त्याच वेळी हे कपडे आत्यंतिक शारीरिक हालचालींदरम्यान देखील कसे अनुकूल आहेत, हे दाखवले आहे.”