​या कारणामुळे अजय देवगणने काजोलसोबत काम करण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 07:36 AM2017-11-08T07:36:04+5:302017-11-08T13:06:04+5:30

अजय देवगण आणि काजोल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. इश्क, प्यार ...

For this reason Ajay Devgn refused to work with Kajol | ​या कारणामुळे अजय देवगणने काजोलसोबत काम करण्यास दिला नकार

​या कारणामुळे अजय देवगणने काजोलसोबत काम करण्यास दिला नकार

googlenewsNext
य देवगण आणि काजोल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. इश्क, प्यार तो होना ही था हे त्यांचे चित्रपट तर प्रचंड गाजले होते. अजय देवगण आणि काजोल हे लग्नानंतर देखील एकत्र चित्रपटात झळकले आहे. अजय देवगणने दिग्दर्शित केलेल्या यु मी और हम या चित्रपटातही काजोल आणि अजयची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकेसे यश मिळाले नव्हते.
काजोल आणि अजय देवगण यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत असल्याने त्यांनी एखाद्या चित्रपटात झळकावे अशी त्यांच्या चाहत्यांची कित्येक दिवसांपासूनची इच्छा आहे. त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार होती. कारण काजोल आणि अजय देवगण यांना एकत्रित चित्रपटात काम करण्यासाठी एका दिग्दर्शकाने विचारले होते आणि त्याने त्याच्या चित्रपटाची कथा देखील अजयला आणि काजोलला ऐकवली होती. ही कथा काजोलला आवडली असल्याचे म्हटले जाते. पण अजयला सध्या काजोलसोबत काम करायचे नाहीये आणि त्यामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काजोल आणि अजयला पुन्हा एकदा चित्रपटात एकत्र पाहाण्यासाठी त्यांच्या फॅन्सना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
अजय देवगणसाठी यंदाचे वर्षं खूपच चांगले आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या त्याच्या गोलमाल अगेन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलचा गल्ला जमवला आहे. त्याच्या या चित्रपटातील भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक धंदा केला आहे. बाहुबली २ः द कन्क्ल्युजन हा चित्रपट याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा चित्रपट या वर्षातील सगळ्याच जास्त पैसा कमवणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानंतर गोलमाल अगेनचा नंबर लागला आहे. गोलमाल अगेन हा एक मसाला चित्रपट असल्याने त्याला आता पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याने त्याने काजोलसोबत काम करण्यास नकार दिला असल्याची चर्चा आहे. 

Also Read : अजय देवगणसोबत लग्न करण्यापूर्वी काजोलचे याच्यासोबत होते अफेअर

Web Title: For this reason Ajay Devgn refused to work with Kajol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.