सोनम कपूरची बहीण प्रसिद्धीपासून कोसो दूर, जवळचा व्यक्ती आहे त्याला कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 04:30 PM2021-02-17T16:30:36+5:302021-02-17T16:33:10+5:30

सोनम कपूरची धाकटी बहीण रिया कपूर तिची बेस्ट फ्रेंड आहे. इतकेच नाही तर सोनमसाठी रिया तिची बिझनेस पार्टनर, फिलॉसॉफर आणि गाईडसुद्धा आहे. रिया असताना तिला इतर मित्रमैत्रिणींची कधी गजर भासली नाही.

For This Reason Anil Kapoor didn't wanted her daughter rhea kapoor Pursued Career In Acting Field | सोनम कपूरची बहीण प्रसिद्धीपासून कोसो दूर, जवळचा व्यक्ती आहे त्याला कारणीभूत

सोनम कपूरची बहीण प्रसिद्धीपासून कोसो दूर, जवळचा व्यक्ती आहे त्याला कारणीभूत

googlenewsNext

झक्कास आणि सदाबहार अभिनेता अनिल कपूर यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य अभिनय क्षेत्राशी जोडला गेला आहे. लेक सोनम कपूर ही एक आघाडीची नायिका आहे. मुलगा हर्षवर्धन याने हिंदी चित्रपटसृष्टीत मिर्झिया चित्रपटातून पाऊल ठेवलं  होते. मात्र त्यालाही फारसे यश मिळू शकले नाही. सोनम आणि हर्षवर्धन दोघेही अभिनय क्षेत्रात येत आपले नशीब आजमावले  मात्र अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया कपूर मात्र अभिनय क्षेत्रात आलेली नाही. यामागचं कारण आहे ते तिचे वडील अभिनेता अनिल कपूर असल्याचे बोलले जाते.

अभिनेत्री बनण्यापासून पापा अनिल कपूर यांनी रोखलं होतं असं रियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. केवळ अभिनेत्रीची बहिण किंवा तिच्यापुढे झाकोळली जाऊ नये अशी पापा अनिल कपूर यांना भीती होती. त्यामुळेच वेकअप सिड चित्रपटाच्या सेटवरील पहिल्याच अनुभवात कल्पना आली होती की अभिनेत्री बनू शकणार नाही असं रियाने या मुलाखतीत सांगितले. 

२०१० साली आयेशा चित्रपटातून रियाने निर्माती म्हणून एंट्री मारली. त्यानंतर २०१४ साली तिने खुबसूरत चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात रियाची बहीण सोनमची भूमिका होती. २०१८साली रिया  निर्मिती असलेल्या वीरे दी वेडिंग चित्रपटाला रसिकांची पसंती मिळाली. रिया एक डिझायनरसुद्धाही आहे. सोनमच्या प्रत्येक लूकवर अखेरची नजर ही रियाचची असते. 

रियाला खाण्या पिण्याचीही तितकीच आवड आहे. ती किती फूडी आहे याची कल्पना रियाचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर नक्कीच येईल. र‍िया कपूर करण बूलानीसह रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकदा दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. खुद्द सोनम कपूरने एका मुलाखतीत दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. 

१० वर्षापेक्षा अधिक काळापासून ते एकमेकांना डेट करत असल्याचंही तिने सांगितले होते. २०१८मध्ये करणने एक व्हिडिओ शेअर केला होता. यांत रिया एका गाण्यावर डान्स करत होती. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करणने माय गर्ल असं लिहिलं होतं. त्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चाही सुरू झाली होती.

Web Title: For This Reason Anil Kapoor didn't wanted her daughter rhea kapoor Pursued Career In Acting Field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.