या कारणामुळे बहिणीच्या बर्थ डे पार्टीत चेहरा लपविताना दिसला अर्जुन कपूर, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 12:14 PM2017-12-30T12:14:29+5:302017-12-30T17:44:29+5:30

काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूरचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. आपल्या बहिणीच्या बर्थ डेला अर्जुन ...

For this reason, Arjun Kapoor appeared in the hiding part of his sister's birthday party, see photo! | या कारणामुळे बहिणीच्या बर्थ डे पार्टीत चेहरा लपविताना दिसला अर्जुन कपूर, पाहा फोटो!

या कारणामुळे बहिणीच्या बर्थ डे पार्टीत चेहरा लपविताना दिसला अर्जुन कपूर, पाहा फोटो!

googlenewsNext
ही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला कपूरचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. आपल्या बहिणीच्या बर्थ डेला अर्जुन आवर्जुन उपस्थित होता. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पोहोचलेल्या अर्जुनची एक झलक बघण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. परंतु याठिकाणी तो चक्क चेहºयाला कपडा गुंडाळून पोहोचला. अर्जुन त्याचा चेहरा का लपवित होता? असा प्रश्न त्यावेळी सगळ्यांनाच पडला होता. कारण एरवी कॅमेºयासमोर बिंधास्त वावरणारा अर्जुन अचानकच चेहरा लपविताना दिसल्याने छायाचित्रकारही काहीसे गोंधळून गेले होते. परंतु चेहरा लपविण्यामागचे कारण आता स्पष्ट झाले आहे. 





रिपोर्ट्सनुसार अर्जुनने त्याच्या आगामी ‘नमस्ते कनाडा’ या चित्रपटासाठी त्याच्या लूकमध्ये बदल केल्याचे समोर आले होते, मात्र त्याच्या काही वेळातच हीदेखील बातमी समोर आली की, त्याने त्याच्या आगामी ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटासाठी लूकमध्ये बदल केल्याने चेहरा लपविला होता. विशेष म्हणजे पार्टीत आल्यापासून ते परत जाण्यापर्यंत अर्जुन त्याचा चेहरा लपवित होता. अर्जुन त्याच्या आगामी ‘संदीप और पिंकी फरार’मध्ये क्लीन शेव्हमध्ये बघावयास मिळणार आहे. 









दरम्यान, आपल्या बहिणीला बर्थ डे विश करण्यासाठी अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बहिणीच्या लहानपणीचा एक फोटो शेअर शेअर केला. फोटोला एक सुंदर कॅप्शन देताना त्याने बहिणीला शुभेच्छा दिल्या. दरम्यान, अंशुलाने तिच्या मित्रांसाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी दिली होती. या पार्टीत तिचे मित्र उपस्थित होते. 

Web Title: For this reason, Arjun Kapoor appeared in the hiding part of his sister's birthday party, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.