जीना इसीका नाम है , वयाच्या ७३ व्या वर्षी राखी गुलजार करतात शेती, आता ओळखणेही जाते कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 17:26 IST2021-06-23T17:24:31+5:302021-06-23T17:26:26+5:30
2009 साली राखी 'क्लासमेट' सिनेमात शेवटच्या झळकल्या होत्या. राखी आता त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहतात. त्यांचे फार्म हाऊस पनवेलमध्ये आहे.

जीना इसीका नाम है , वयाच्या ७३ व्या वर्षी राखी गुलजार करतात शेती, आता ओळखणेही जाते कठीण
70 च्या दशकात अनेक सुंदर अभिनेत्री होत्या आणि त्यापैकी एक राखीगुलजार होत्या ज्यांनी आपल्या अदाकारीसोबतच आपल्या सौंदर्यानेही रसिकांची मनं जिंकली. राखी आता 73 वर्षांच्या झाल्या आहेत.काळानुसार त्यांच्यात झालेला कायापालट पाहून आता त्यांना ओळखणंही अवघडच.राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाद्वारे राखी यांनी सिनेसृष्टीत करिअरची सुरूवात केली.
पहिल्या चित्रपटातूनच त्यांना प्रचंड यश मिळाले. राखी यांनी त्यांच्या सिनेकारकीर्दीत बर्याच चित्रपटांत काम केले आहे. मुख्य नायिकेपासून ती अनेक चित्रपटांमध्ये आई आणि आजीच्या भूमिकेतही झळकल्या आहेत. तसे, 73 वर्षाची राखी आता आता बॉलिवूडपासून बर्याच लांबही गेल्या आहेत. 2009 साली राखी 'क्लासमेट' सिनेमात शेवटच्या झळकल्या होत्या. राखी आता त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहतात.त्यांचे फार्म हाऊस पनवेलमध्ये आहे.
मुंबईही त्यांना नकोशी झाली होती, मायानगरीचा कंटाळा आला होता म्हणून पनवेलच्या फार्महाऊसमध्ये त्या स्थायिक झाल्या. तिथेच शेती करण्यात त्या बिझी झाल्या.निसर्गाच्या सानिध्यात राहणेच त्यांना जास्त आवडते त्यामुळे पनवेलमध्येच राहणे त्या जास्त पसंत करतात. पनवेलमधल्या फार्महाऊसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यात राखी बिझी राहतात. त्या शेतीही करतात.
वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळांची त्यांनी त्यांच्या शेतात लागवडही केली आहे. राखी यांना एक मुलगी आहे मेघना गुलजार असे तिचे नाव असून मेघनाने देखील सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. राखी गुलजार झगमगाटाच्या दुनियेपासून दूर जात साधे पद्धतीने जीवन जगत आहेत.
कुटुंबात १९ लोक होते पण तरीही राखी गुलजार यांनी स्वतःला कोंडून घेतले होते, जाणून घ्या कारण
एका मुलाखतीत राखी यांनी लग्नानंतर त्यांच्या आयुष्याबद्दलचे खुलासे केले होते. यात त्यांनी म्हटले होते की, लग्नानंतर आयुष्य फार बदलले होते, एकांतात जगणंत मला जास्त आवडू लागले होते. माझ्या कुटुंबात १९ लोक होते पण मी स्वतःला घरत आयसोलेट करून घ्यायची. जवळच्या मित्रांबरोबर वेळ घालवण्याच्या वेळेत मी मी व्ही. शांताराम, सोहराब मोदी, महबूब खान आणि के.आसिफ यांचे चित्रपट पाहाण्यात वेळ घालवणे जास्त पसंत केले. गुलजार यांच्यात झालेल्या मतभेदांमुळेच भलेही आज एकत्र राहत नसलो तरीही मैत्री मात्र कायम आहे.