Saif Kareena Troll :कारमध्ये सैफ आणि करिनाने केली इतकी मोठी चूक, पाहून चाहत्यांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:27 PM2022-01-07T17:27:13+5:302022-01-07T17:27:29+5:30
व्हिडीओ जर नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की सैफ अली खान (Saif Ali Khan) स्वतः कार चालवत आहे आणि करीना कपूर (Kareena Kapoor) सतत कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. फोनवर बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसतोय.
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत. ते जिथे जातात तिथे मीडियाचे कॅमर्यांची त्याच्यावर नजर असते.त्यामुळे त्यांच्या चर्चा या होतच असतात. नुकतेच सैफ आणि करीना कारमध्ये मीडियाच्या कॅमेर्यात कैद झाले होते, दोघेही अगदी सिंपल लूकमध्ये दिसले, तर यादरम्यान करिना मात्र थोडी टेन्शनमध्येही दिसली होती, आता तिच्या चिंतेचे नेमकं कारण काय होते हे फक्त बेबोलाच माहीत असेल. सध्या सैफ करिना त्यांच्या या नव्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. खरं तर, सैफिनाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांची खूप मोठी चूक पकडली आहे, त्यांच्याकडून कोणती चूक झाली हे कदाचित सैफ करिनालाही माहिती नसेल.
व्हिडीओ जर नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की सैफ अली खान स्वतः कार चालवत आहे आणि करीना कपूर सतत कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. फोनवर बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसतो, पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या वेळी दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नाही, ही सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी चूक आहे.
घाईघाईत हे दोघेही सीट बेल्ट लावायला विसरले असतील, पण लोकांनी त्यांच्या चुकीकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही आणि सैफिनाला ट्रोल करायला सुरुवात केली. व्हिडीओवर कमेंट करून यूजर्स दोघांवरही चांगलाच संताप व्यक्त करताना दिसत आहे. नुकतीच करीना कपूर खान कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरी झाली आहे. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर करीना गेल्या काही दिवसांपासून आयसोलेटेड होती, मात्र आता ती पूर्णपणे निरोगी आहे.कोरोनामुक्त झालेल्या करिनाला आता मास्कचाही विसर पडल्याचे दिसते. सैफ आणि करिना दोघांनीही यावेळी मास्क लावलेला दिसत नाही. एरव्ही सेलिब्रेटीच इतरांना मास्क लावा, सुरक्षित राहा सांगताना दिसतात. तिथे हेच सेलिब्रेटी इतंक निष्काळजीपणे कोरोनाकाळात बिनधास्त फिरत असतील तर सामान्यांनी तरी यांच्याकडून कितपत बोध घ्यावा हाच प्रश्न इथे निर्माण होतो.