या कारणासाठी पद्मावतीचा ट्रेलर दुपारी ०१:०३ मिनिटांनी रिलीज करण्यात आला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 12:03 PM2017-10-09T12:03:00+5:302017-10-09T17:33:00+5:30

रणवीर सिंग दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर ह्यांची मुख्य भूमिका असलेल्या जय लीला भन्साली दिग्दर्शित चित्रपट पद्मावतीचे ट्रेलर आज ...

For this reason Padmavati's trailer was released in the afternoon at 01:03 | या कारणासाठी पद्मावतीचा ट्रेलर दुपारी ०१:०३ मिनिटांनी रिलीज करण्यात आला

या कारणासाठी पद्मावतीचा ट्रेलर दुपारी ०१:०३ मिनिटांनी रिलीज करण्यात आला

googlenewsNext
वीर सिंग दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर ह्यांची मुख्य भूमिका असलेल्या जय लीला भन्साली दिग्दर्शित चित्रपट पद्मावतीचे ट्रेलर आज दुपारी ०१:०३ मिनिटांनी रिलीज करण्यात आले. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला ह्यात शंकाच नाही पण तुम्हाला माहित आहे का ट्रेलर लाँच करण्यासाठी दुपारी ०१:०३ हीच वेळ का ठेवण्यात आली? 
चला आम्हीच तुम्हाला सांगतो की ही अशी वेळ फिल्म मेकर्सनी का निवडली ते. दिग्दर्शक संजय लीला भन्साली हे आपल्या कामाच्या बाबतीत एकदम परफेक्ट म्हणून ओळखले जातात. ०१:०३ मिनिटांनी ही वेळ जर आपण २४ आर्स  फॉरमॅट मध्ये पहिली तर ती १३.०३ अशी येते. आपणास माहिती आहे का की महाराजा रावल रतन सिंह आणि अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका शाहिद कपूर आणि रणवीर सिंग साकारत आहेत. यांचे वास्तविक युद्ध सन 1330 मध्ये लढले गेले होते. यावरून आपल्या लक्षात आलेच असेल की दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा अभ्यास किती दांडगा आहे. 

ALSO RAED : Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!

याला मेकर्सची अंधश्रद्धा म्हणायचे किंवा त्यांचे लकी चार्म म्हणून निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगसाठी ही वेळ निवडली. यात राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोण साकारते आहे. दीपिकाच्या या लूकचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तिने या लूकमध्ये तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत.या लूकमध्ये येण्यासाठी दीपिकाला कमीत कमी एक तास लागायचा.  त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, ते देखील खूप वजनदार आहेत. खरे तर राणी पद्मावती म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर महिला. तिचे किस्से आजही चित्तोडगडमध्ये ऐकवले जातात. तर पद्मावतीच्या सेटवर शूटिंग दरम्यान शाहिद कपूर आणि रणवीर सिंग ही जखमी झाला होता.  शाहिद एक स्टंट सीन शूट करीत होता, त्याचदरम्यान त्याचा हा अपघात झाला.  तर पद्मावती’चा क्लायमॅक्स शूट करीत असताना रणवीरच्या डोक्याला दुखापत झाली होती. 
हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. गेले अनेक दिवसांनापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.  

Web Title: For this reason Padmavati's trailer was released in the afternoon at 01:03

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.