या कारणामुळे राणी मुखर्जीच्या हिचकीची रिलीज डेट पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 07:11 AM2018-02-02T07:11:51+5:302018-02-02T12:41:51+5:30

अभिनेत्री राणी मुखर्जी मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे. आदिराचा जन्मानंतर राणी हिचकी नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ...

For this reason, postponement of the release date of Rani Mukherjee's hiccup | या कारणामुळे राणी मुखर्जीच्या हिचकीची रिलीज डेट पुढे ढकलली

या कारणामुळे राणी मुखर्जीच्या हिचकीची रिलीज डेट पुढे ढकलली

googlenewsNext
िनेत्री राणी मुखर्जी मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे. आदिराचा जन्मानंतर राणी हिचकी नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आधी हा चित्रपट 23 फेब्रुवारीला रिलीज होणार होता मात्र आता तो 23 मार्चला रिलीज होणार आहे. आदित्याने या चित्रपटाची स्पेशल स्क्रिनिंग ठेवली होती आणि काही खास लोकांना हा चित्रपटही दाखवला. चित्रपट संपल्यानंतर लोकांनी उभ राहुन टाळ्या देखील वाजवल्या. सूत्रांच्या माहितीनुसार हिचकीच्या टीमने आदित्यला चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. 

तुम्ही विचार कराल जर मग ऐवढ्या लवकर आदित्यने चित्रपटाचे स्क्रिनिंग का ठेवले. तर या मागचे कारण आहे आदित्यला लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या. जर चित्रपटात एखादा बदल करायचा असेल तर तो करायला वेळ मिळाला पाहिजे म्हणून आदित्यने काही खास लोकांनासाठी स्क्रिनिंग केले. आदित्यला हे चांगलेच ठाऊक आहे की राणीच्या करिअरच्या दृष्टीने हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे. जर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला तर तिचा करिअर ग्राफदेखील खाली येईल. 

हिचकी चित्रपटात राणी मुखर्जी नैना माथूर नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. नैनाला  टॉरेट सिंड्रोमने नावाच्या आजाराने ग्रासलेले असते. त्यामुळी ती बोलताना अडखळते आणि एकच वाक्य दोन वेळा बोलते. तसेच बोलता बोलता विचित्र आवाज काढते, तिच्या या सवयीमुळे तिच्या आयुष्यात काशी आव्हान येतात आणि त्यांना ती कशी सामोरे जाऊन ती मात करते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्याच बरोबर समाजात कमजोर व्यक्ती आणि कणखर व्यक्ती ह्यात चालू असलेला भेदभाव यात दिसून येईल. नैनाची शिक्षिका बनायची इच्छा आहे पण तीच्या आजारपणा मुळे ती शिक्षिका होऊ शकत नाही हे तिला सांगण्यात येते. इथून पुढे तिच्या संघर्षाची गोष्ट सुरु होते.  महेश शर्मा निर्मित आणि सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट २३फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ALSO READ :  ​OMG!!​ राणी मुखर्जीनेही केली सलमान खानसारखीच ‘चोरी’!

Web Title: For this reason, postponement of the release date of Rani Mukherjee's hiccup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.