OMG! रिया सेनने घेतला धसका; प्रेग्नंट राहण्याची वाटते भीती!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 16:03 IST2019-04-22T15:21:04+5:302019-04-22T16:03:47+5:30
आपल्या बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री रिया सेन दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. पण लवकरच ‘पॉईजन’ या वेब सीरिजमध्ये ती दिसणार आहे. याच सीरिजच्या निमित्ताने रिया मीडियासमोर आली आणि आपल्या वैवाहिक आयुष्यावर आणि प्रेग्नंसीवर मनमोकळेपणाने बोलली.

OMG! रिया सेनने घेतला धसका; प्रेग्नंट राहण्याची वाटते भीती!!
आपल्या बोल्ड फोटोंमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री रिया सेन दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. पण लवकरच ‘पॉईजन’ या वेब सीरिजमध्ये ती दिसणार आहे. याच सीरिजच्या निमित्ताने रिया मीडियासमोर आली आणि आपल्या वैवाहिक आयुष्यावर आणि प्रेग्नंसीवर मनमोकळेपणाने बोलली. यादरम्यान रियाने एक मोठा खुलासा केला. तो कुठला तर प्रेग्नंट होण्यापासून वाटत असलेली भीती.
होय, आई कधी होणार, असा प्रश्न रियाला यावेळी विचारला गेला. यावर रियाने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. ‘आई व्हायला मला आवडेल. पण लेबर पेनची मला प्रचंड भीती वाटते. त्यामुळे प्रेग्नंट होण्याची मला भीती वाटते. मला आणि माझ्या पतीला दोघांनाही बाळ हवे आहे. पण सध्या तरी आम्ही त्यासाठी कुठलेही प्लानिंग केलेले नाही. सध्या आम्ही आपआपल्या कामात बिझी आहोत,’ असे रिया म्हणाली.
आपल्या वैवाहिक आयुष्यावर बोलताना ती म्हणाली की, माझा नवरा कमालीचा समजुतदार आहे. मी जशी आहे, तशीच लोकांना आवडते, हे त्याने मला ठासून सांगितले. शिवाय पटवूनही दिले. माझ्या करिअरचे निर्णय घेण्यासाठी तो मला मदत करतो. माझे वडिल होते, तो अगदी तसाच आहे. असेही रिया म्हणाली.
रियाही अभिनेत्री मुनमुन सेनची मुलगी आहे. २०१७ मध्ये रियाने बॉयफ्रेन्ड शिवम तिवारीसोबत लग्नगाठ बांधली. हे एक सीक्रेट मॅरेज होते. कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र इतकेच या लग्नाला हजर होते. हे लग्न इतक्या घाईघाईत झाले की, यानंतर रिया लग्नापूर्वी प्रेंग्नंट आहे, अशी चर्चा पसरली. पण नंतर ही चर्चा अफवा निघाली.