या कारणामुळे सलमान खानचे वडील, ज्येष्ठ लेखक सलीम खान अडकले वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 05:06 AM2018-06-14T05:06:42+5:302018-06-14T10:36:42+5:30
बेटिंगमुळे अगोदरच आयपीएल कलंकित झाले असून, या सीजनमध्येही त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण आयपीएल सामन्यांवरील बेटिंग ...
ब टिंगमुळे अगोदरच आयपीएल कलंकित झाले असून, या सीजनमध्येही त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याचा संशय पोलिसांना आहे. कारण आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानला समन्स बजावला आणि या समन्सच्या माध्यमातून त्याला चौकशीसाठी देखील बोलावण्यात आले होते. यावेळी त्याने सट्टा लावल्याची कबुली दिली आणि आता या प्रकरणात सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ लेखक सलीम खान यांचे नाव देखील समोर आले आहे.
ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरू असलेल्या आॅनलाइन बेटिंगचे रॅकेट उघड करताना डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड हा चालवत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सोनूवर कारवाई करताना त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी सोनूची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे अरबाजही बेटिंग करीत असल्याची माहिती समोर आली होती आणि आता त्यानेच चौकशी दरम्यान सांगितले आहे की, सलमानचे वडील सलीम खान देखील पूवी त्याच्या मार्फत बेटिंग करायचे, पण आता ते बेटिंग करतात का याची त्याला कल्पना नाहीये. याविषयी ठाणे अँटी एक्सटोर्शन सेलचे पोलिस इन्स्पेक्टर कोठमिरे सांगतात, आयपीएलच्या अनेक मॅचवर पूर्वी सलीम खान नियमितपणे बॅटिंग करत असत. पण सध्या तरी त्यांची याबाबत काहीही चौकशी होणार नाहीये.
सोनूकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने सोनूला पैसे दिले. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी सोनूने अरबाजकडे तगादा लावला होता. तो अरबाजला पैसे देण्यासाठी सतावत असल्याचे देखील म्हटले जात आहे. अरबाजचे सोशल मीडियावर सोनूसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते.
अरबाजनंतर सलीम खान यांचे नाव आल्यानंतर खान कुटुंबियांना नक्कीच धक्का बसला असणार...
Also Read : न चुकता सलमान खानची वाट कोण बघतं? याविषयी सलमानने केला दस का दममध्ये खुलासा