तर या कारणामुळे शाहिद कपूरने सोडला दिग्दर्शक इम्तियाज अलीचा सिनेमा !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 02:05 PM2018-08-08T14:05:20+5:302018-08-08T14:33:57+5:30

शाहिद कपूर जब वी मेट दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात काम करणार नाही आहे. दोघे एकत्र काम करत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र काही तरी बिनसलं आणि तसे होऊ शकत नाहीय.

 For this reason Shahid Kapoor left the director, Imtiaz Ali's cinema! | तर या कारणामुळे शाहिद कपूरने सोडला दिग्दर्शक इम्तियाज अलीचा सिनेमा !

तर या कारणामुळे शाहिद कपूरने सोडला दिग्दर्शक इम्तियाज अलीचा सिनेमा !

googlenewsNext
ठळक मुद्दे'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

शाहिद कपूर जब वी मेट दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात काम करणार नाही आहे. दोघे एकत्र काम करत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र काही तरी बिनसलं आणि तसे होऊ शकत नाहीय. शाहिद कपूर आणि इम्तियाज अली यांनी 2007मध्ये 'जब वी मेट' हा सुपरहिट सिनेमा दिला होता. या सिनेमाला रिलीज होऊन दहा वर्ष झाली आहे. दोघांना एकत्र बघण्याची त्यांच्या फॅनची इच्छा होती. 


डीएनएच्या रिपोर्टनुसार शाहिद कपूरने स्वत:ला या सिनेमापासून वेगळे केले आहे. शाहिदने यासिनेमापासून  स्वत:ला विनम्रता पूर्वक दूर केले आहे. मात्र इम्तियाज या सिनेमाचे शूटिंग सुरु करु शकला नाही कारण त्याला निर्माता मिळाला नाही. त्यामुळे शाहिदने हा सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. 


'पद्मावत'नंतर शाहिद कपूर 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा सिनेमा वीज चोरीवर आधारित आहे. वीज कंपनीच्या पायऱ्या झिजवणाऱ्या सामान्य माणसाची कथा पाहायला मिळणार आहे. यात शाहिदसोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
शाहिदला हे वर्ष खूप लकी ठरल्याचे बोलले जात आहे.शाहिद कपूर लवकरच  नव्या घराची किंमत 55 कोटी 60 लाख आहे. त्याचे हे घर 42 आणि 43 व्या माळ्यावर आहे. शाहिदने या घरासाठी 2 कोटी 91 लाखांची स्टँप ड्यूटी दिली आहे. शाहीदचे हे घर खूपच अलिशान असल्याची चर्चा आहे. तो लवकरच या घरामध्ये शिफ्ट होणार आहे. 

Web Title:  For this reason Shahid Kapoor left the director, Imtiaz Ali's cinema!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.