म्हणून 'शेरनी'साठी विद्या बालनच होती निर्मात्याची पहिली पसंती, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 01:18 PM2021-06-09T13:18:26+5:302021-06-09T13:23:52+5:30
विद्या बालनने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'परिणिता', 'लगे रहो मुन्नाभाई', 'डर्टी पिक्चर', 'पा', 'इश्किया', 'कहानी', 'कहानी-2 'या तसेच मागच्या वर्षीचा सिनेमा 'शकुंतला देवी' मधील गणितज्ञची भूमिका असो किंवा 'तुम्हारी सुलू' मधील आरजे असो ह्या अभिनेत्रीने बॉलिवूड मध्ये स्वतःसाठी एक स्थान मिळवलं आहे.
अभिनेत्री विद्या बालन हिचा 'शेरनी' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील विद्याच्या भूमिकेकडे सा-यांच्या नजरा लागल्या आहेत. आजवर विद्याने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. परिणिता, लगे रहो मुन्नाभाई, डर्टी पिक्चर, पा, इश्किया, कहानी, कहानी-2 या तसेच मागच्या वर्षीचा सिनेमा 'शकुंतला देवी' मधील गणितज्ञची भूमिका असो किंवा 'तुम्हारी सुलू' मधील आरजे असो ह्या अभिनेत्रीने तिच्या प्रत्येक भूमिकेने सिनेमाप्रेमींना चकित करून, बॉलिवूड मध्ये स्वतःसाठी एक स्थान मिळवलं आहे आणि अशा भूमिका साकारत आहेत ज्या इतर कोणत्याही अभिनेत्याने करण्याचा प्रयत्न केला नसेल किंवा करण्याचा विचार ही केला नसेल. अशा कित्येक सिनेमातील विद्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत.
विद्याची अष्टपैलुत्व, कलाकुसरबद्दल तिचे समर्पण आणि तिने पार पडलेल्या प्रत्येक भूमिकेबद्दलची तिची आवड तिचा आपलेपणा या कारणांमुळेच निर्माते भूषण कुमार आणि विक्रम मल्होत्रा यांनी पुरस्कार विजेते दिग्दर्शक अमित मसुरकर यांच्या शेरनी चित्रपटात मुख्य भूमिकासाठी या अभिनेत्री ची निवड केली . मानव-प्राण्यांच्या संघर्षावर आधारित या चित्रपटात, हिंदी चित्रपटसृष्टीत प्रथमच वन अधिकाऱ्याची भूमिकेत विद्या दिसणार आहे या चित्रपटाचा अंतिम कट पाहून निर्माते क्लीन बोल्ड झालेत . विद्याने अशी बहु-स्तरीय व्यक्तिरेखा साकारली आहे जी अत्यंत कठीण असून पण कमकुवत आहे, निर्भय असूनही दबली आहे.
अबंडनशीया एंटरटेनमेंट चे निर्माते विक्रम मल्होत्रा या अभिनेत्रीचे कौतुक करताना म्हणतात की, "विद्या एक अपवादात्मक अभिनेत्री आहे आणि तिने गेल्या 16 वर्षांत जी कामे केली आहेत त्याच्यावर डाय हार्ड फॅन फॉलोइंग तयार झालं आहे. शकुंतला देवीवर एकत्र काम करताना मी पाहिले की , तिने स्वत: ला त्या गुंतागुंतीच्या भूमिकेमध्ये कसे घडवून घेतले आणि प्रत्येक गुंतागुंतीच्या तपशीलात बारकाईने कसे लक्ष घातले . आमच्यासाठी शेरनीमध्ये विद्या शिवाय कधीच दुसरं कोणीही होऊच शकलं नसतं."
टी-सीरिज, भूषण कुमार पुढे म्हणाले, “तुम्हारी सुलूमध्ये विद्याबरोबर काम करताना आम्हाला खूप मजा आली. ती एक समर्पित अभिनेत्री आहे आणि कलेवर असणार तिचं नितांत प्रेम स्क्रीनवर झळकते . विद्याबरोबर काम करणं म्हणजे नेहमीच मजेदार आणि शिकण्याचा एक चांगला अनुभव आहे. ती प्रत्येक दिग्दर्शकाची ॲक्टर नाही तर प्रत्येक निर्मात्याची ही आवडती आहे. "भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि अमित मसुरकर निर्मित शेरनी 18 जून 2021 पासून अमेझॉन प्राइम रसिकांना पाहता येणार आहे.