​या कारणामुळे कमनशिबी म्हणून हिणवण्यात आले होते विद्या बालनला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 05:49 AM2018-01-02T05:49:10+5:302018-01-02T11:19:10+5:30

विद्या बालनने आज बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत परिणिता, डर्टी पिक्चर, पा, ...

For this reason, Vidya Balan was harassed as Kamnshibi | ​या कारणामुळे कमनशिबी म्हणून हिणवण्यात आले होते विद्या बालनला

​या कारणामुळे कमनशिबी म्हणून हिणवण्यात आले होते विद्या बालनला

googlenewsNext
द्या बालनने आज बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत परिणिता, डर्टी पिक्चर, पा, इश्किया, तुम्हारी सुलू, नो वन किल्ड जेसिका यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिने आजवर कहानी, परिणिता, द डर्टी पिक्चर, इश्किया, पा, तुम्हारी सुलू यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी पुरस्कार पटकावले आहेत. विद्या ही आज आघाडीची अभिनेत्री असली तरी  बॉलिवूडमध्ये स्वतःची जागा निर्माण करणे हे तिच्यासाठी खूप कठीण होते.
विद्या बाललने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली. हम पाच या मालिकेत तिने राधिकाची भूमिका साकारली होती. आज हम पाच या मालिकेला इतकी वर्षं झाली असली तरी आज ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे. या मालिकेतील विद्याने साकारलेली राधिका देखील प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या मालिकेनंतर अनेक वर्षांनी विद्याला चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. विद्याने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिचे भाग्य आजमावायचे ठरवले होते. ती दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता मोहनलालसोबत चक्रम या चित्रपटात झळकणार होती. हा चित्रपट विद्याने साइन देखील केला होता. या चित्रपटानंतर तब्बल १२ सिनेमे तिला मिळाले होते. पण काही कारणास्तव या चित्रपटाचे चित्रीकरण सतत पुढे ढकलले जात होते. मोहनलालने साऊथमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या करियरमध्ये कोणतेच चित्रपट डिले झाले नव्हते. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यावेळी विद्याला कमनशिबी म्हटले होते. त्यानंतर या चित्रपटातून विद्याची हकालपट्टी झाली. तसेच मोहनलाल यांनी देखील या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. निर्मात्यांनी दुसरे कलाकार घेऊन हा चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटानंतर विद्या विद्याच्या हातून तिने साईन केलेले १२ चित्रपट देखील गेले. तो काळ विद्यासाठी खूपच वाईट होता. पण विद्याने हार मानली नाही. ती ऑडिशन्स, स्क्रीन टेस्ट देतच होती. परिणिती या चित्रपटाच्या वेळी तर तिने ४० स्क्रीन टेस्ट, १७ मेकअप टेस्ट दिल्या होत्या. यानंतरच या चित्रपटासाठी विद्याची निवड करण्यात आली होती. 

Also Read : ​विद्या बालन शाळेत असताना या निर्मात्यावर होते तिचे क्रश

Web Title: For this reason, Vidya Balan was harassed as Kamnshibi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.