गेल्या वर्षभरात एकही चित्रपट न करता अशाप्रकारे शाहरुख खानने केली 124 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 19:00 IST2019-12-29T19:00:00+5:302019-12-29T19:00:02+5:30

शाहरुखची गेल्या वर्षाची कमाई 124 करोड रुपये असून कोणत्याही चित्रपटात काम न करता शाहरुखची इतकी कमाई कशी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

This is a reason why not doing even one movie although shahrukh khan in forbes list | गेल्या वर्षभरात एकही चित्रपट न करता अशाप्रकारे शाहरुख खानने केली 124 कोटींची कमाई

गेल्या वर्षभरात एकही चित्रपट न करता अशाप्रकारे शाहरुख खानने केली 124 कोटींची कमाई

ठळक मुद्देशाहरुख हा केवळ अभिनेताच नव्हे तर तो एक बिझनेसमन देखील आहे. तसेच त्याचे रेड चिलीज हे प्रोडक्शन हाऊस असून या प्रोडक्शन हाऊसने बार्ड ऑफ ब्लड या वेबसिरिजची गेल्या वर्षी निर्मिती केली होती.

फोर्ब्स इंडियाने सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्धी मिळवणाऱ्या 100 सेलिब्रेटींची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश आहे. फोर्ब्स इंडियाच्या यादीत पहिल्या स्थानावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीची वार्षिक कमाई 252.72 कोटी आहे. तर दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमारने स्थान मिळवले आहे. अक्षयची वार्षिक कमाई 293.25 कोटी रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान आहे. सलमानची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

गेल्या संपूर्ण वर्षांत एकही चित्रपटात काम न केलेल्या शाहरुख खानचा देखील या यादीत समावेश असून या यादीत शाहरुख सहाव्या क्रमांकावर आहे. शाहरुखची गेल्या वर्षाची कमाई 124 करोड रुपये असून कोणत्याही चित्रपटात काम न करता शाहरुखची इतकी कमाई कशी काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. 

शाहरुख हा केवळ अभिनेताच नव्हे तर तो एक बिझनेसमन देखील आहे. तसेच त्याचे रेड चिलीज हे प्रोडक्शन हाऊस असून या प्रोडक्शन हाऊसने बार्ड ऑफ ब्लड या वेबसिरिजची गेल्या वर्षी निर्मिती केली होती. या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय तो एकूण 14 ब्रँडच्या जाहिराती करतो. या सगळ्यातून वर्षभरात त्याची मिळकत 124 कोटी इतकी आहे. 

शाहरुखने 2018 मध्ये 56 कोटी इतकी तर 2017 मध्ये त्याने तब्बल 170.5 कोटी इतकी कमाई केली होती. 

Web Title: This is a reason why not doing even one movie although shahrukh khan in forbes list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.