या कारणामुळे एका बाईने चारचौघात वाजवली होती अभिषेक बच्चनच्या कानशिलात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 09:03 AM2018-02-06T09:03:10+5:302018-02-06T14:33:10+5:30
एका बाईने अभिषेक बच्चनच्या कानाखाली वाजवली होती हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. ...
ए ा बाईने अभिषेक बच्चनच्या कानाखाली वाजवली होती हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे. अभिषेक बच्चनच्या कानशिलात एका बाईने लगावली होती आणि या प्रसंगाविषयी अभिषेकनेच स्वतः युटिव्हीवरील यह है मेरी कहानी या कार्यक्रमात सांगितले होते. अभिषेकने रेफ्युजी या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. अभिषेकची चित्रपटसृष्टीत एंट्री होणार हे कळल्यावर प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली होती. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना आजवर त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांना तर सदी का महानायक असेच म्हटले जाते. जया आणि अमिताभ यांसारख्या प्रतिभावंत कलाकारांचा मुलगा देखील तितकाच चांगला कलाकार असणार असे सगळ्यांनाच वाटत होते. रिफ्यूजी या चित्रपटातील अभिषेकच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक देखील केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वौत्तम नवोदित अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता. पण त्यानंतर ढाई अक्षर प्रेम के, तेरा जादू चल गया, बस्स इतना सा ख्वाब है असे एका मागोमाग फ्लॉप चित्रपट अभिषेकने दिले.
अभिषेक एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट देत असताना त्याच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडली होती. त्याच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग तो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. या प्रसंगाविषयी त्याने युटिव्हीवरील यह है मेरी कहानी या कार्यक्रमात सांगितले होते. अभिषेकचा शरारत हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या दरम्यान ही गोष्ट घडली होती. याविषयी अभिषेकने सांगितले होते, शरारत हा माझा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांचा रिस्पोन्स कसा आहे हे पाहायला मी जेटी गॅलेक्सी येथे गेलो होतो. एक बाई चित्रपटाच्या मध्यांतरानंतर बाहेर आली होती. मला समोर पाहाताच ती माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या कानाखाली वाजवली आणि ती म्हणाली, तू तुझ्या कुटुंबाचे नाव धुळीस मिळवले आहेस. अभिनय करणे बंद कर...
Also Read : ऐश्वर्या बच्चन नाही तर या मैत्रिणीने दिले अभिषेक बच्चनला खास गिफ्ट