रिसेप्शन सोनम कपूरचे पण चर्चेचा विषय ठरले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 07:06 AM2018-05-09T07:06:00+5:302018-05-09T12:37:16+5:30

सोनम कपूरच्या रिसेप्शनमध्ये जेवढी चर्चा सोनम आणि आनंदची झाली तेवढीत तिथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचीदेखील झाली. अनेक कलाकारांनी सोनमच्या रिसेप्शनला ...

Reception Sonam Kapoor, Ranbir Kapoor and Alia Bhatt! | रिसेप्शन सोनम कपूरचे पण चर्चेचा विषय ठरले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट !

रिसेप्शन सोनम कपूरचे पण चर्चेचा विषय ठरले रणबीर कपूर आणि आलिया भट्ट !

googlenewsNext
नम कपूरच्या रिसेप्शनमध्ये जेवढी चर्चा सोनम आणि आनंदची झाली तेवढीत तिथे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचीदेखील झाली. अनेक कलाकारांनी सोनमच्या रिसेप्शनला येऊन सोहळ्याला चार चाँद लावले. या सगळ्यात सर्वांच्या नजऱ्या खिळल्या त्या आलिया आणि रणबीरवर. सोनम कपूरच्या लग्नात हे लव्हबर्ड एकत्र आले. दोघांनी मीडियासमोर आलं नातं स्वीकारले नाही मात्र त्यांच्यातले स्पेशल बॉडिंग कधी लपलेसुद्धा नाही.   

नुकतेच दोघे एक डिनर डेटवरसुद्धा एकत्र दिसले होते. डिनर झाल्यानंतर दोघे एकाच गाडीतून जाताना सुद्धा दिसले.ऐवढेच काय तर आलियाने काही दिवसांपूर्वी आपला बर्थ डे रणबीर सिंग आणि नितू सिंग यांच्यासोबत सेलिब्रेट केला होता. 


आलिया सध्या तिचा आगामी चित्रपट 'राजी'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतेच मुंबईत राजीचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आला होते. यावेळी आलियासोबत याठिकाणी रणबीरसुद्धा उपस्थित होता. ऐवढेच नाही तर स्क्रिनिंगनंतर दोघे एकत्र बाहेर निघाल्यावर आलिया त्याच्या फॅन्स आणि मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून  रणबीर कपूर प्रोटेक्ट करताना दिसला होता हा व्हिडीओ सोशल मीडियावरपण चांगला व्हायरल झाला होता. 

ALSO READ :  अफेअरच्या चर्चा ताज्या असतानाच डिनर डेटवर गेले आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

आलिया आणि रणबीर  ब्रम्ह्रास्त्र चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढल्याची चर्चा आहे. 
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्ह्रास्त्र' हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात मौनी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी या चित्रपटात नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. आता आलिया आणि रणबीरची ऑफस्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना सिल्वर स्क्रिन भावते हे आपल्याला चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल.  

Web Title: Reception Sonam Kapoor, Ranbir Kapoor and Alia Bhatt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.