Reena Roy : सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:20 IST2023-01-09T16:18:54+5:302023-01-09T16:20:09+5:30

७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रीना रॉय.

reena-roy-breaks-silence-on-why-sonakshi-looks-exactly-like-her | Reena Roy : सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा

Reena Roy : सोनाक्षी माझ्यासारखीच दिसते कारण...रीना रॉय यांनी स्वत:च केला खुलासा

Reena Roy : ७० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रीना रॉय. रीना यांनी नुकताच ६६ वा वाढदिवस साजरा केला. हिंदी सिनेजगतातील त्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. एकेकाळी त्यांचे नाव अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत जोडले गेले होते. त्यांच्या नात्याची चर्चा जोरदार रंगली होती.  इतकंच नाही तर शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हुबेहुब रीना रॉय यांच्यासारखी दिसते अशी चर्चा आजही होते. 

रीना रॉय यांनी केला खुलासा

रीना रॉय आणि सोनाक्षी सिन्हा या इतक्या सारख्या कशा दिसतात, त्यांचे डोळे आणि नाक हे अगदी हुबेहुब एकमेकींसारखे दिसते हे कसं शक्य आहे असा प्रश्न अनेत वर्ष चाहत्यांना पडला होता. आता यावर रीना रॉय यांनी स्वत:च खुलासा केला आहे. या चर्चांना ब्रेक लावत रीना रॉय यांनी सांगितले, 'हा फक्त एक योगायोग आहे. कधीकधी असे घडू शकते. जितेंद्र यांची आई आणि माझी आई देखील जुळ्या बहिणी सारख्या दिसायच्या. '

रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांची प्रेम कहाणी 

रीना रॉय आणि शत्रिघ्न सिन्हा एकमेकांच्य़ा प्रेमात होते. मात्र शत्रुघ्न सिन्हा यांचे आधीच लग्न झाले होते. आता रीना यांनी शत्रुघ्न यांना ताकीद दिली होती की त्यांनी जर लग्नाला होकार दिला नाही तर ८ दिवसांच्या आत त्या दुसऱ्याशी लग्न करतील. शत्रुघ्न सिन्हा परिस्थितीमुळे लग्न करु शकले नाहीत.यानंतर रीना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान यांच्याशी लग्न केले. 

मोहसिन खान यांच्याशी लग्न केल्यानंतर रीना यांनी मुलीला जन्म दिला. तिचे नाव समन खान असे आहे. मात्र काही वर्षातच रीना आणि मोहसिन खान यांचा घटस्फोट झाला. 

Web Title: reena-roy-breaks-silence-on-why-sonakshi-looks-exactly-like-her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.