सख्ख्या बहिणीच्या लग्नात खलनायिका ठरल्या होत्या रेखा, अभिनेत्रीचा होता या नात्याला जोरदार विरोध, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:56 PM2023-10-10T14:56:38+5:302023-10-10T14:59:23+5:30

Rekha: रेखा यांच्यामुळे त्यांच्या सख्ख्या बहिणीचं लग्न रखडलं होतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात त्या बहिणीसाठी खलनायिका ठरल्या.

Rekha 69th birthday when actress didnt want sister dhanlaxmi to marry married popular villain tej sapru | सख्ख्या बहिणीच्या लग्नात खलनायिका ठरल्या होत्या रेखा, अभिनेत्रीचा होता या नात्याला जोरदार विरोध, कारण...

सख्ख्या बहिणीच्या लग्नात खलनायिका ठरल्या होत्या रेखा, अभिनेत्रीचा होता या नात्याला जोरदार विरोध, कारण...

 सदाबहार अभिनयासह सौंदर्यामुळे बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा (rekha). अनेक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या रेखाचं प्रोफेशनल लाइफ जितकं चर्चेत राहिलं त्याच्यापेक्षा कैकपटीने त्यांचं पर्सनल आयुष्य चर्चेत आलं.  रेखा १० ऑक्टोबर रोजी त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण त्यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. आजही त्या आपल्या सौंदर्याने अनेक सौंदर्यवतींना टक्कर देतात. पण तुम्हाला माहिती आहे का रेखा यांच्यामुळे त्यांच्या सख्ख्या बहिणीचं लग्न रखडलं होतं. त्यामुळे खऱ्या आयुष्यात त्या बहिणीसाठी खलनायिका ठरल्या.

रेखा यांना सहा सख्ख्या बहिणी असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यातलीच एक बहीण म्हणजे धनलक्ष्मी. रेखाप्रमाणेच धनलक्ष्मी हिलादेखील तिच्या खऱ्या आयुष्यात अनेक चढउतार पाहावे लागले. यात एका ठिकाणी तर रेखा या त्यांच्यासमोर संकट म्हणून उभी राहिल्या होत्या. मात्र, रेखा यांचा विरोध झुगारुन धनलक्ष्मीने तिला हव्या त्याच अभिनेत्यासोबत लग्न केलं.

बॉलिवूड अभिनेता तेज सप्रू यांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही ते धनलक्ष्मीला डेट करत होते. त्यामुळे त्यांचं हे नातं रेखा यांना अजिबात मान्य नव्हतं. तेज विवाहित असल्यामुळे आपल्या बहिणीसोबत काही चुकीचं घडू नये ही भीती रेखा यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी या लग्नाला जोरदार विरोध केला होता. परंतु, रेखा यांच्या आईने धनलक्ष्मी आणि तेज यांच्या नात्याला परवानगी दिली होती. तेज आपले जावई व्हावेत अशी तिच्या आईची इच्छा होती. मात्र, तेज यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे रेखा यांना हे नातं मान्य नव्हतं. एका मुलाखतीत तेज यांनीही याविषयी भाष्य केलं होतं.

धनलक्ष्मीसोबत लग्न करता यावं यासाठी तेजने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि रेखाच्या बहिणीशी संसार थाटला. पहिल्या पत्नीला तेज यांनी घटस्फोट दिल्यानंतर रेखाने धनलक्ष्मीच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर तेज आणि धनलक्ष्मी यांनी सर्वांच्या परवानगीने १९८७ साली लग्नगाठ बांधली.
 

Web Title: Rekha 69th birthday when actress didnt want sister dhanlaxmi to marry married popular villain tej sapru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rekhaरेखा