रेखा महिला सेक्रेटरीसोबत रिलेशनशिपमध्ये, प्रसिद्ध लेखकाचा मोठा दावा, म्हणाला, "त्यांच्या बेडरुममध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:24 PM2023-07-21T16:24:59+5:302023-07-21T16:25:50+5:30
रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रसिद्ध लेखकाने मोठा दावा केला आहे.
७०-८०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या रेखा त्यांच्या सोंदर्याने आजही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवतात. 'नागिन', 'घर', 'जुदाई', 'अगर तुम ना होते', 'गंगा की सौगंद' असे अनेक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. बॉलिवूडमधील करिअरप्रमाणेच रेखा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत होत्या. आता पुन्हा एकदा रेखा चर्चेत आल्या आहेत. रेखा त्यांच्या महिला सेक्रेटरीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा प्रसिद्ध लेखकाने केला आहे.
लेखक यासर उस्मान यांनी रेखा यांच्या जीवनावर बायोपिक लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी रेखा त्यांची महिला सेक्रेटरी फरझानासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. फक्त फरझानाला रेखा यांच्या बेडरुममध्ये जाण्याची परवानगी असल्याचंही त्यांनी पुस्तकात म्हटलं आहे. गेले तीन दशक म्हणजेच ३० वर्षांपासून रेखा आणि फरझाना रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर रेखा यांचे पती मुकेश अग्रवाल यांनी फरझानामुळेच आत्महत्या केल्याचं उस्मान यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेखा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.
रेखा यांचं बॉलिवूडमधील अनेक कलाकारांबरोबर नाव जोडलं गेलं होतं. त्यांनी मार्च १९९० साली उद्योगपती मुकेश अग्रवाल यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. परंतु, अवघ्या काही महिन्यांतच रेखा लंडनमध्ये असताना त्यांच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं होतं.