Rekha माझ्या पतीच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिली, Vinod Mehra यांच्या पत्नीने इतक्या वर्षानंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 01:33 PM2021-12-27T13:33:25+5:302021-12-27T13:40:03+5:30
विनोद मेहरा( Vinod Mehra) आता या जगात नाही आता इतक्या वर्षांनंतर त्यांची पत्नी किरण मेहराने(Kiran Mehra) एका मुलाखतीदरम्यान पती आणि रेखाच्या (Rekha) अफेअरबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्री आणि बॉलीवुड दिवा रेखा यांच्या अभिनयावर सारेच फिदा आहेत. त्यांच्या अभिनयासह त्यांचं घायाळ करणारं सौंदर्य याची जादू आजही रसिकांवर कायम आहे. मग हीच जादू त्यांच्यासोबत काम केलेल्या त्यांच्या सहकलाकारांवर झाली नसती तरच नवल. रेखा यांच्या सौंदर्यावर त्यांचे अनेक सहकलाकार फिदा झाले. त्यामुळेच कित्येक कलाकारांशी रेखा यांचं नाव जोडलं गेलं.
रेखा (Rekha) आणि विनोद मेहरा (Vinod Mehra) यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केलं. काम करता करता दोघांमध्ये एक प्रेमाचं नातं निर्माण झालं. दोघंही लग्नबंधनात अडकले. मात्र विनोद मेहरा यांच्या मनातील पत्नी रेखा बनू शकल्या नाही. इतकंच नाही तर विनोद मेहरा यांच्या मातोश्रींनाही रेखा सून म्हणून मान्य नव्हत्या. त्यावेळी आई आणि पत्नी यापैकी एकाची निवड करण्यास रेखा यांनी विनोद मेहरा यांना सांगितलं. त्यावेळी विनोद मेहरा यांनी प्रेमाऐवजी आपल्या आईला निवडलं होतं.
विनोद मेहरा आता या जगात नाही आता इतक्या वर्षांनंतर त्यांची पत्नी किरण मेहराने एका मुलाखतीदरम्यान पती आणि रेखाच्या अफेअरबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ETimes ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, किरण यांना विनोद मेहरा यांच्या अफेअरबाबत अनेक गोष्टी विचारण्यात आल्या.
यावेळी किरण यांनी सांगितले की, ''माझ्या पतीच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जवळची व्यक्ती राहिली रेखा. आजही ती आमच्या कुटुंबातील सदस्यासारखीच आहे. रेखाने आमच्या लग्नाला हजेरी लावली नसली तरी, माझे तिच्या बरोबर खूप चांगले नाते निर्माण झाले होते. जेव्हा कधी मी रेखाला भेटते तिला घट्ट मिठी मारायला विसरत नाही.रेखाची आई आणि बहिणींनासुद्धा मी खूप चांगली ओळखते''.
विनोद मेहरा यांच्या आयुष्यात आलेल्या महिलांबद्दल विचारण्यात आले, यावरही किरण यांनी सांगितले की, विनोद यांना मी त्यांच्या भूतकाळाविषयी काही विचाण्यााधीच त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. ज्यांच्यासोबत त्यांचे अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या तो त्यांचा भूतकाळ होता. त्यांना माझ्यासोबत राहायचे आहे असे जेव्हा त्यांनी सांगितले त्यानंतर एकही प्रश्न विचारला नाही.