रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याविषयी रेखाने दिली होती ही कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 19:28 IST2021-02-13T19:27:02+5:302021-02-13T19:28:22+5:30

रेखा यांच्यासोबतचा विनोद मेहरा यांचा रोमान्स त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. दोघांची गुपचूप लग्न केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 

rekha was never married to vinod mehra confessed in rendezvous with simi garewal | रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याविषयी रेखाने दिली होती ही कबुली

रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याविषयी रेखाने दिली होती ही कबुली

ठळक मुद्देरेखा यांनी सांगितले होते की, विनोद हे माझ्यासाठी खूप खास होते. माझ्या आयुष्यात त्यांची खास जागा होती. पण मी आणि विनोद यांनी कधी लग्न केले नाही.

सहजसुंदर अभिनय, बोलके डोळे आणि समोरच्याला क्षणात जिंकून घेईल अशा हास्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते म्हणजे विनोद मेहरा. बॉलिवूडमध्ये ७० व ८० च्या दशकांत विनोद मेहरा यांनी सर्वांना वेड लावले होते. त्या काळातील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून ओळखले जाणारे विनोद मेहरा आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे काही यादगार सिनेमे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. १३ फेब्रुवारी १९४५ मध्ये जन्मलेल्या विनोद मेहरा यांची अभिनयाची कारकीर्द आणि व्यक्तिगत आयुष्य दोन्ही प्रचंड गाजले.

विनोद मेहरा यांचे पहिले लग्न मीना ब्रोकासोबत झाले होते. पण लग्नानंतर काहीच वर्षांत बिंदिया गोस्वामी त्यांच्या आयुष्यात आल्या. पण विनोद यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर बिंदिया जे.पी. दत्ता यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी काहीच वर्षांत लग्न केले. बिंदिया यांना घटस्फोट दिल्यानंतर एकाकी पडलेले विनोद मेहरा अभिनेत्री रेखा यांच्या जवळ आले. रेखा यांच्यासोबतचा विनोद मेहरा यांचा रोमान्स त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. दोघांची गुपचूप लग्न केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. 

रेनदे विथ सिमी गरेवाल या कार्यक्रमात सिमी यांनी रेखा यांना विचारले होते की, विनोद मेहरा आणि तुझं लग्न झालं असं म्हटले जाते हे खरे आहे का त्यावर क्षणाचाही विलंब न लावता रेखा यांनी सांगितले होते की, विनोद हे माझ्यासाठी खूप खास होते. माझ्या आयुष्यात त्यांची खास जागा होती. पण मी आणि विनोद यांनी कधी लग्न केले नाही. रेखा यांचे हे उत्तर ऐकल्यानंतर सिमी यांनी पुन्हा एकदा विचारले होते. खरंच तुम्ही लग्न केल नव्हते का... त्यावर कधीच नाही असे उत्तर रेखा यांनी दिले होते.

रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले होते असा उल्लेख एका पुस्तकात देखील करण्यात आला होता. यासिर उस्मान यांनी रेखा यांच्या आयुष्यावर रेखाः द अन्टोल्ड स्टोरी हे पुस्तक लिहिले होते. रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केले ही गोष्ट त्यांनी कधीच मीडियात मान्य केली नाही.

Web Title: rekha was never married to vinod mehra confessed in rendezvous with simi garewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.