एका किसिंग सीनमुळे 10 वर्षे अडकला होता रेखा यांचा हा चित्रपट, जाणून घ्या हे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 09:00 IST2020-07-04T09:00:00+5:302020-07-04T09:00:02+5:30
अभिनेत्री रेखा त्यावेळी बोल्ड सीनमुळे खूप चर्चेत आल्या होत्या.

एका किसिंग सीनमुळे 10 वर्षे अडकला होता रेखा यांचा हा चित्रपट, जाणून घ्या हे प्रकरण
हल्ली कोणताही सिनेमा हिट करण्यासाठी चित्रपटात एक बोल्ड गाणं किंवा बोल्ड सीन्सचा वापर केला जातो. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा चित्रपटात अशा सीन्सला परवानगी नव्हती. त्याच काळात अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या एका सिनेमात बोल्ड सीन दिला होता. हा बोल्ड सीन पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र हा चित्रपट बोल्ड सीनमुळे सेन्सॉरशीपमध्ये अडकला होता.
अभिनेत्री रेखा यांनी 1969 साली 'अंजाना सफर' में चित्रपटात अभिनय केला होता. या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमात त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत बिस्वजीत होते.चित्रपटातील एका सीनमध्ये रेखा यांनी बिस्वजीत यांना किस केले होते. या सीनची खूप चर्चा झाली होती. या सीनमुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनाई केली होती. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनंतर 1979 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला.
जेव्हा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज केला गेला तेव्हा त्यात खूप बदल करण्यात आले होते. सर्वात मोठा बदल होता तो म्हणजे चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. अंजाना सफरचे दो शिकारी करण्यात आले. त्यात अभिनेता विनोद खन्ना मुख्य भूमिकेत होते आणि अमजद खान यांच्या पात्राचा समावेश करण्यात आला होता.
भलेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला बराच काळ लोटून गेला होता.पण जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 1979 साली हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा निर्मात्यांनी विनोद खन्ना नावारुपाला आल्यामुळे या चित्रपटात दोन नायक सादर केले. अन्यथा मूळ सिनेमात मुख्य भूमिकेत फक्त बिस्वजीत होते.छोट्या सहायक भूमिकेत विनोद खन्नादेखील होते.