Rekha ची सावत्र आई होती सुपरस्टार, 100 कोटीच्या संपत्तीची होती मालक, पण पतीने उद्ध्वस्त केलं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:26 AM2023-01-19T10:26:07+5:302023-01-19T10:28:33+5:30

Mahanati Savitri Life Facts: बरेच लोक सावित्रीला रेखाची सावत्र आई म्हणूनही ओळखतात. 4 मुलांचे वडील आणि स्टार जेमिनी गणेशनची दुसरी पत्नी असणं तिच्यासाठी फार चुकीचं ठरलं.

Rekha's step-mother Mahanati Savitri interesting facts and Gemini Ganesan love story | Rekha ची सावत्र आई होती सुपरस्टार, 100 कोटीच्या संपत्तीची होती मालक, पण पतीने उद्ध्वस्त केलं आयुष्य!

Rekha ची सावत्र आई होती सुपरस्टार, 100 कोटीच्या संपत्तीची होती मालक, पण पतीने उद्ध्वस्त केलं आयुष्य!

googlenewsNext

Mahanati Savitri Life Facts: साऊथची पहिली लेडी सुपरस्टार होती महानटी सावित्री (Mahanati Savitri). लोक तिची देवीसारखी पूजा करत होते. 60 च्या दशकात 100 कोटी रूपयांची संपत्ती असलेल्या सावित्रीला दागिन्यांची फार आवड होती. तिच्या घरात सतत सोनार बसून राहत होता. डायरेक्टर, निर्माते आणि फॅन्स तिच्या घरासमोर गर्दी करत होते. 

बरेच लोक सावित्रीला रेखाची सावत्र आई म्हणूनही ओळखतात. 4 मुलांचे वडील आणि स्टार जेमिनी गणेशनची दुसरी पत्नी असणं तिच्यासाठी फार चुकीचं ठरलं. आयुष्य जेवढं संघर्षात गेलं त्यापेक्षा वेदनादायी तिचा मृत्यू झाला.

6 डिसेंबर 1935 ला गुंटूरमध्ये सावित्रीचा जन्म फारच गरीब परिवारात झाला होता. ती केवळ 6 वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं होतं. तेव्हा मामाने त्यांच्या परिवाराला आधार दिला. टॅलेंटमुळे तिला डान्स आणि नाटकात जागा मिळाली. मामा तिला मद्रासला ऑडिशनसाठी घेऊन जात होते. पण सुरूवातील सगळीकडून रिजेक्शन मिळत होतं. 

एक दिवस जेमिनी स्टुडिओमध्ये ऑडिशन देत असताना तिची भेट जेमिनी गणेशनसोबत झाली. त्यांनी सावित्रीचा एक फोटो काढला आणि मॅगझीनमध्ये छापला. त्यानंतर तिला पहिला सिनेमा समसारन मिळाला. पण तिच्या बालीश वागण्यामुळे तिला सिनेमातून काढलं गेलं. 
नंतर तिला काही छोटे-मोठे रोल मिळाले. त्यानंतर मुख्य भूमिका मिळाल्या. सोबत काम करत असताना ती जेमिनी गणेशनच्या प्रेमात पडली.

दोघांनी गपचूपपणे 1952 मध्ये लग्नही केलं. जेमिनी हे आधीच विवाहित होते आणि 4 मुलांचे वडील होते. त्यांचं पुष्पावलीसोबत अफेअर सुरू होतं. या अफेअरमधून त्यांना दोन मुली रेखा आणि राधा झाल्या. दोघांच्या लग्नाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा लक्स साबणाच्या जाहिरातीचा करार साइन करताना तिने तिचं नाव सावित्री गणेशन लिहिलं.

1958 मध्ये आलेल्या मायाबाजारमधून सावित्री स्टार बनली. बघता बघता लोक तिची पूजा करू लागले होते. पण हेच पती जेमिनीला खटकत होतं. जेमिनी तिला दारू पाजू लागले होते. पतीच्या दग्यामुळे आणि वाईट वागण्यामुळे सावित्रीला दारूचं व्यसन लागलं. काही सिनेमात पैसा लावला पण फक्त नुकसान झालं. 

इतकंच काय तर टॅक्स न भरल्याने इन्कम टॅक्सवाल्यांनी तिची सगळी संपत्ती सीज केली. तेव्हा आपलं सगळं काही विकून कसंतरी जीवन जगत होती. 1969 मध्ये जेमिनी तिला सोडून गेले आणि तिची स्थिती आणखी खालावली. लोकांच्या मदतीसाठी नेहमीच समोर येणाऱ्या सावित्रीच्या मदतीला कुणीही समोर आलं नाही. गरीबी आणि एकटेपणामुळे सावित्री 1980 मध्ये कोमात गेली आणि 19 महिने कोमात राहिल्यानंतर 26 डिसेंबर 1983 ला तिचं निधन झालं.

Web Title: Rekha's step-mother Mahanati Savitri interesting facts and Gemini Ganesan love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.