प्रदर्शनापुर्वीच ‘या’ बायोपिक्सबाबत चर्चेला उधाण !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 05:17 PM2019-03-29T17:17:28+5:302019-03-29T17:19:01+5:30
बॉलिवूडमध्ये सध्या राजकारण्यांवर आधारित बोयोपिक बनविले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' हा बायोपिक रिलीज झाला होता. शिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरही ‘ठाकरे’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. यासही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अजून काही बायोपिक आहेत जे रिलीज अगोदरच चर्चेत आले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...
-रवींद्र मोरे
बॉलिवूडमध्ये सध्या राजकारण्यांवर आधारित बोयोपिक बनविले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' हा बायोपिक रिलीज झाला होता. शिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरही ‘ठाकरे’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. यासही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अजून काही बायोपिक आहेत जे रिलीज अगोदरच चर्चेत आले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...
* पीएम मोदी बायोपिक
पीएम मोदी यांच्या आयुष्यावर आधारित हा बायोपिक अगोदर ५ एप्रिल रोजी रिलीज होणार होता, मात्र निवडणूकी दरम्यान हा चित्रपट रिलीज होत असल्याने विरोध होत आहे. यात पीएम मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉय साकारत आहे. होळीच्या दिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. मात्र जसाही ट्रेलर रिलीज झाला तशा या चित्रपटाच्या समस्या वाढल्या. या चित्रपटाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निवडणूकीदरम्यान हा चित्रपट रिलीज होत असल्याने हे आचार संहिताचे उल्लंघन आहे, असे याचिकेत म्हटले आहे. हा चित्रपट मतदारांनाही प्रभावित करु शकतो असेही त्यात म्हटले आहे.
* जयललिता बायोपिक
कंगना राणावतने तिच्या वाढदिवशी चाहत्यांना एक मोठे गिफ्ट दिले होते. कंगनाने तिच्या वाढदिवशी हे जाहिर केले होते की, ती तमिळनाडूची माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे तमिळ नाव 'थलाइवी' आणि हिंदीमध्ये ‘जया’ हे नाव असेल. कंगना या चित्रपटाविषयी म्हटली की, ‘जयललिता आपल्या देशाची सर्वात यशस्वी महिला होती, ती तिच्या काळातील सुपरस्टारही होती आणि त्यानंतर ती राजकारणातही यशस्वी झाली. तिच्यावर बनत असलेल्या चित्रपटात मी मुख्य भूमिका साकारत असून मला खूपर्च गर्व वाटत आहे. लवकरच या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार आहे.’
* मायावती बायोपिक
मीडिया रिपोर्टनुसार बहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती यांचा बायोपिक बनण्याची तयारी सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करु शकतात असेही ऐकण्यात आहे. विशेष म्हणजे मायावती यांची भूमिका साकारण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचेही नाव निश्चित करण्यात आल्याची चर्चा आहे. या बायोपिकसाठी अगोदर सात - आठ अभिनेत्रींचे नाव समोर आले होते, मात्र विद्या निश्चित करण्यात आली असल्याचे समजते.
* लाल बहादुर शास्त्री बायोपिक
'द ताशकंद फाइल्स' या नावाचा लाल बहादुर शास्त्री यांचा बायोपिक असून याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. हा चित्रपट १२ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. यास विवेक अग्निहोत्रीने डायरेक्ट केला आहे. या बायोपिकमध्ये नसीरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती, पंकज त्रिपाठी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा बायोपिक रिलीज झाला तर कॉँगे्रस अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात असून या बायोपिकबाबतही चर्चेला उधाण आले आहे.