कधी रिलीज होणार 'देवा'चा ट्रेलर? शाहिद कपूरने नवं पोस्टर शेअर करुन दिली मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:11 IST2025-01-15T12:07:44+5:302025-01-15T12:11:09+5:30
शाहिद कपूरच्या आगामी 'देवा' सिनेमाच्या ट्रेलरबद्दल स्वतः अभिनेत्याने खुलासा केलाय (deva, shahid kapoor)

कधी रिलीज होणार 'देवा'चा ट्रेलर? शाहिद कपूरने नवं पोस्टर शेअर करुन दिली मोठी अपडेट
शाहिद कपूरची भूमिका असलेला 'देवा' सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काहीच दिवसांपूर्वी 'देवा'चा शानदार टीझर रिलीज झाला. याशिवाय सिनेमातील पहिलं गाणं 'भसड मचा'ही रिलीज झालं. या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे 'देवा'च्या ट्रेलरची. शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'देवा'चा ट्रेलर कधी रिलीज होणार, यावर स्वतः शाहिदने अपडेट दिली आहे.
कधी येणार 'देवा'चा ट्रेलर
शाहिद कपूरने सोशल मीडियावर 'देवा'चं नवीन पोस्टर शेअर केलंय. या पोस्टरमध्ये शाहिदच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसून येत आहेत. याशिवाय त्याच्या तोंडात सिगरेट असलेली पाहायला मिळतेय. या फोटोत शाहिदचा अनोखा स्वॅग पाहायला मिळतोय. या फोटोखाली शाहिदने कॅप्शन लिहिलंय की, ट्रेलर अगले हफ्ते. अशाप्रकारे शाहिदने दिलेल्या अपडेटनुसार 'देवा'चा ट्रेलर पुढील आठवड्यात येणार आहे.
'देवा' कधी रिलीज होणार?
शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेला 'देवा' सिनेमाची उत्सुकता सध्या शिगेला आहे. 'देवा' सिनेमात शाहिद कपूरसोबत पूजा हेगडे झळकणार आहे. या सिनेमात खलनायक म्हणून कोण असणार, याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 'देवा' सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. 'कमीने' सिनेमानंतर अनेक दिवसांनी शाहिद ग्रे शेड भूमिकेत बघायला मिळणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.