'पद्मावती'च्या रिलीजचा मार्ग मोकळा. संजय लीला भन्साळी यांना सेन्सॉर बोर्डाकडून मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 09:30 AM2017-12-30T09:30:23+5:302018-01-02T12:34:30+5:30

संजय लीला भन्साळी यांच्यासाठी आणि 'पद्मावती'च्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. सतत्याने होणाऱ्या विरोधानंतर अखेर पद्मावती चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा ...

Release the path of 'Padmavati' release. Sanjay Leela Bhansali gets relief from censor board | 'पद्मावती'च्या रिलीजचा मार्ग मोकळा. संजय लीला भन्साळी यांना सेन्सॉर बोर्डाकडून मिळाला दिलासा

'पद्मावती'च्या रिलीजचा मार्ग मोकळा. संजय लीला भन्साळी यांना सेन्सॉर बोर्डाकडून मिळाला दिलासा

googlenewsNext
जय लीला भन्साळी यांच्यासाठी आणि 'पद्मावती'च्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. सतत्याने होणाऱ्या विरोधानंतर अखेर पद्मावती चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाले आहे. सेन्सॉर बोर्डने  चित्रपटाचे नाव बदलून पद्मावत करुन त्याला रिलीज करायला सांगितले आहे. याबाबतची अधिकृत माहिती अजून मिळालेली नाही. सेन्सॉरने चित्रपटाला U/A चित्रपट देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ हा चित्रपट 12 वर्षांखाली मुलं आपल्या आई-वडिलांसोबत जाऊन बघू शकतात.  मीडिया रिपोर्टनुसार सेन्सॉरने  चित्रपटात काही बदल करण्यास सांगितले आहे आणि संजय लीला भन्साळी हे बदल करण्यास तयार ही झाले आहेत. याशिवाय चित्रपटातील घूमर गाण्यातही काही बदल होणार आहेत.   





'पद्मावती’च्या रिलीजवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून  लावली होती. त्यानंतर ‘पद्मावती’च्या रिलीजचा वाद सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात आला होता.  सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहण्यासाठी जयपूरमधील दोन प्रख्यात इतिहासकारांना आमंत्रित केले होते.या इतिहासकारांमध्ये प्रो. बी. एल. गुप्ता आणि प्रो. आर. एस. खांगराट यांचा समावेश आहे. गुप्ता राजस्थान विश्वविद्यालयात इतिहासाचे प्रोफेसर आहेत. तसेच त्यांनी मध्ययुगीन कालखंडांवर बºयाचशा पुस्तकांचे लेखन केले आहे, तर खांगराट अग्रवाल महाविद्यालयाचे प्रमुख आहेत. ‘

हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राजपूत करणी सेनेने केला होता. मात्र संजय लीला भन्साळी यांनी हा आरोप नेहमीच फेटाळला होते. कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. चित्रपट साकारताना आम्ही राजपुत घराणेशाहीची मानमयार्दा राखली आहे, असे संजय लीला भन्साळी यांनी म्हटले होते. आधी हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र रिलीज डेट जवळ येत होती तशीच चित्रपटाचा विरोध वाढत जात होता. 

यात चित्रपट राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोणने साकरली आहे. शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे.  तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: Release the path of 'Padmavati' release. Sanjay Leela Bhansali gets relief from censor board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.