Remembering Irfan Khan : कहॉँ तुम चले गये, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:34 AM2020-05-04T11:34:19+5:302020-05-04T11:34:52+5:30

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इरफानचे चाहते भावूक झाले आहेत.

Remebering Irrfan Khan: When He relishing some pani puri after the last day of a shoot. | Remembering Irfan Khan : कहॉँ तुम चले गये, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावूक

Remembering Irfan Khan : कहॉँ तुम चले गये, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावूक

googlenewsNext

इरफान खानच्या अकाली निधनाने सा-यांनाच मोठा धक्का बसला आहे.  29 एप्रिल रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुमारे आठवडाभरापूर्वी कोलोनच्या संसर्गामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान इरफानने कायमचे सा-यांना अलिवदा म्हटले. 

दरम्यान सोशल मीडियावर इरफान खान यांचा एक  व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर इरफानचे चाहते भावूक झाले आहेत. इरफान खान आपल्यात नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही, अशा शब्दांत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.एका चाहत्याने लिहिले की, एका सेकंदासाठी मला असे वाटले की, इरफान इथेच आहे. त्याला काहीही झाले नाही. सुतापाजी, तुम्हाला आणि अयानला खूप प्रेम... आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, ते आपल्या आठवणीत कायमच राहतील.


इरफानच्या मुलगा बाबिलने नुकताच इंस्टाग्रामवर इरफानचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरफान पाणी पुरीचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करताना बाबिलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा तुम्ही बराच काळ डाएटवर असता आणि शूट संपल्यानंतर तुम्ही पाणीपुरी खाता..’हा व्हिडीओ पाहून अनेकांना अश्रु अनावर होत आहे. अशा अनेक गोष्टींमुळे  इरफान आपल्या मनात कायम घर करुन राहणार आहेत.
 

Web Title: Remebering Irrfan Khan: When He relishing some pani puri after the last day of a shoot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.