कल हो ना होमधील फ्रँकी बनला आहे सेलिब्रेटी ट्रेनर, बनवलेय पिळदार शरीर, ओळखणे होतंय अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:26 IST2021-03-25T19:23:44+5:302021-03-25T19:26:00+5:30
फ्रँकी म्हणजेच दीपेशने पिळदार शरीर बनवले असून त्याच्यात प्रचंड बदल झाला आहे. आता त्याला ओळखणे देखील अशक्य होत आहे.

कल हो ना होमधील फ्रँकी बनला आहे सेलिब्रेटी ट्रेनर, बनवलेय पिळदार शरीर, ओळखणे होतंय अशक्य
शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला कल हो ना हो हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, गाणी, चित्रपटातील कलाकारांचे अभिनय सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. या चित्रपटात स्वीटू म्हणजेच डेलनाझ इराणीच्या प्रियकराच्या भूमिकेत आपल्याला फ्रँकी पाहायला मिळाला होता.
या चित्रपटातील फ्रँकीचे खरे नाव दीपेश भट आहे. दीपेशची कल हो ना हो या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रचंड प्रसिद्ध झाली असली तरी त्याने अभिनयसृष्टीपासून दूर जाणेच पसंत केले. तो आता फिटनेस कोच बनला आहे.
दीपेश अभिनयसृष्टीत नसला तरी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटनुसार तो आमिर खान, रणबीर कपूर, जॅकलिन फर्नांडिस यांना ट्रेनिंग देतो. त्याने त्याची क्रॉस फिट ओम बॉक्स नावाची त्याची जीम देखील सुरू केली आहे.
दीपेश आता खूप वेगळा दिसत असून त्याला ओळखणे देखील कठीण जात आहे. त्याने पिळदार शरीर बनवले असून त्याच्या शरीरावर अनेक टॅटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने त्याचे नाव शिवोहम असे लिहिले आहे.