'मोना डार्लिंग' म्हणणारा अभिनेता आठवतोय? गटारात राहून काढले दिवस, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्याचं नशीबच बदललं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 12:55 PM2024-03-02T12:55:33+5:302024-03-02T12:55:57+5:30
Bollywood Actor : १९६० आणि १९७० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून या अभिनेत्याची आठवण काढली जाते.
'मोना डार्लिंग' म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूडचा खलनायक अजित (Ajit) आता आपल्यात नाहीत. १९६० आणि १९७० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून त्यांची आठवण काढली जाते. पण जेव्हा त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हा ते अनेक सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले. दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या 'नया दौर' चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली होती, जिथे त्यांनी सहाय्यक भूमिका केली होती आणि त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता त्यांचा मुलगा शहजाद खान याने एका मुलाखतीत त्यांच्याबद्दल काही खुलासे केले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्याचे संघर्षाचे दिवस सांगितले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत वडिलांना किती अडचणींचा सामना करावा लागला हे सांगितले.
सिद्धार्थ कन्नन यांच्याशी संवाद साधताना शहजादने सांगितले की, 'नया दौर' चित्रपटानंतर त्याचे वडील अजित खान यांना ४-५ वर्षे कोणतेही काम न मिळाल्याने त्यांच्या करिअरमध्ये घसरण झाली. 'नया दौरनंतर त्याचा वाईट काळ सुरू झाला. ४-५ वर्षांपासून त्यांच्याकडे काम नव्हते. जेव्हा त्यांना यामागचे कारण विचारण्यात आले तेव्हा शहजाद म्हणाला की मुख्य कलाकार 'असुरक्षित' आहेत आणि त्यांना वाटते की अजित त्यांची लाइमलाइट घेईल.
अजित खान गटारात झोपायचे
शहजादने सांगितले की, 'नायक असुरक्षित होते की त्यांनी अजितसोबत काम केले तर ते पुरस्कार घेतील आणि त्या नायकांना ओळख मिळणार नाही.' वडिलांचे मुंबईतील संघर्षाचे दिवस त्यांना आठवले. अजित यांना अनेक दिवस गटारात झोपावे लागत असल्याचे सांगितले. 'त्यांनी मला मोहम्मद अली रोडजवळील एक गटार दाखवून सांगितले की, हैदराबादहून मुंबईला आल्यावर गटारात झोपावे लागले होते.'
अजित यांनी उदरनिर्वाहासाठी विकली होती पुस्तके
शहजादने सांगितले की, त्याच्या वडिलांनी कॉलेजची पुस्तके विकली जेणेकरून ते मुंबईत येण्यासाठी काही पैसे जमा करू शकतील. १९९८ मध्ये अजितचा मृत्यू झाला आणि काही वर्षांनी आई सारालाही कॅन्सर झाला. शहजादने सांगितले की त्याच्या भावांनी आर्थिक स्थिती चांगली असूनही खर्च उचलण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.
शहजादच्या भावांनी आईवर उपचार केले नाहीत
त्याने सांगितले की त्याच्या वडिलांनी मागे ठेवलेले सर्व पैसे त्याच्या नातेवाईकांनी आणि भावाने घेतले होते. त्यामुळे त्याला आईवर उपचार करणं कठीण झालं होतं. 'माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या भावाने हॉस्पिटलचे ५००० रुपयांचे बिल भरण्यास नकार दिला. त्याच्याकडे चांगली मालमत्ता होती. असे असतानाही त्याने आईचे दागिनेही घेतले आणि रुग्णालयाची फीही भरली नाही.