Black मधली चिमुकली आठवतेय का? कुरळे केस, घारे डोळे आजही खूप क्यूट दिसते आएशा कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 16:43 IST2024-02-05T16:42:30+5:302024-02-05T16:43:25+5:30
१९ वर्षांनंतर 'ब्लॅक' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. सिनेमातील ही चिमुकली आता कशी दिसते बघा!

Black मधली चिमुकली आठवतेय का? कुरळे केस, घारे डोळे आजही खूप क्यूट दिसते आएशा कपूर!
संजय लीला भन्साळी यांचा मास्टरपीस सिनेमा 'ब्लॅक' तब्बल 19 वर्षांनंतर ओटीटीवर रिलीज झाला आहे. राणी मुखर्जी (Rani Mukherjee) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या दमदार अभिनयाने या सिनेमात जीव ओतला होता. त्यांचं काम प्रत्येकाच्याच मनाला भिडलं होतं. सिनेमात राणी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका आयेशा कपूर (Ayesha Kapur)या बाल अभिनेत्रीने केली होती. तिनेही तोडीस तोड काम केलं होतं. इतक्या वर्षांनंतर आता आयेशा कशी दिसते बघा.
आयेशा कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. सिनेमात राणी मुखर्जीचं पात्र मिशेल जी लहानपाणासूनच दिव्यांग असते. आएशाने केलेली तिच्या लहानपणीची भूमिका खूपच कौतुकास्पद आहे. थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी तिला मिळाली होती. तेही संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात. आएशानेही नुकतंच 'ब्लॅक'च्या ओटीटी रिलीजबाबत पोस्ट शेअर केली. मनोरंजनसृष्टीतील अनेक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. तसेच कुरळे केस, ब्राऊन डोळे पाहून लहानपणीच्या आयेशाचीच आठवण येते. तरी तिचा बदललेला लूकही खूपच सुंदर आहे.
आयेशा अभिनेत्री तर आहेच पण ती न्यूट्रिशन कोचही आहे. आयआयएन न्यूयॉर्कमधून तिने सर्टिफाईड न्यूट्रिशन कोचचे ट्रेनिंग घेतले आहे. ती न्यूट्रिशन संबंधी व्हिडिओही शेअर करत असते. तिने आईसोबत मिळून याचा व्यवसाय सुरु केला आहे.