वाचा नव्वदीच्या दशकात प्रसिद्धीझोतात आलेले हे कलाकार आता काय करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 01:03 PM2020-12-30T13:03:08+5:302020-12-30T13:09:02+5:30
काही कलाकार भारतातच आहेत तर काही परदेशात स्थायिक झाले आहेत.
बॉलिवूडमध्ये प्रत्येक दिवसाला नवीन कलाकार येत असतात. काही कलाकार टिकून राहातात तर काही कलाकार कुठे गायब होतात हे कळत देखील नाहीत.
नवव्दीच्या दशकात प्रसिद्ध झालेले अनेक कलाकार सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. काही कलाकार भारतातच आहेत तर काही परदेशात स्थायिक झाले आहेत. अशाच काही कलाकारांविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
पापा कहते है या चित्रपटातील घर से निकलते ही या गाण्यातील घाऱ्या डोळ्यांचा नायक तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात मुख्य भूमिकेत जुगल हंसराज दिसला होता. जुगलच्या मोहोब्बते या चित्रपटाला तर प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. पण त्याला नंतर चित्रपटांमध्ये यश मिळाले नाही. काही वर्षांपूर्वी तो कहानी २ या चित्रपटात झळकला होता. त्याने नुकतेच एका वेबसिरिजमध्ये काम केले होते.
पापा कहते है य चित्रपटात जुगलसोबत आपल्याला मयुरी कांगो दिसली होती. मयुरीने या चित्रपटानंतर प्यार की जीत, बादल, बेताबी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ती सध्या गुगल इंडियामध्ये काम करत असून एका मोठ्या पदावर आहे.
जुम्मा चुम्मा दे दे हे गाणे प्रेक्षकांच्या आजही चांगलेच लक्षात आहे. या गाण्यात किमी काटकर झळकली होती. किमीने लग्न केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. ती सध्या तिच्या कुटुंबियांसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहाते.
गुड् नालो इश्क मीठा हे नव्वदीच्या दशकातील गाणे लोकांनी डोक्यावर घेतले होते. या गाण्यात आपल्याला जस अरोरा हा प्रसिद्ध अभिनेता पाहायला मिळाला होता. जस काही वर्षांपूर्वी धरती का वीर योद्धा पृथ्वीराजमध्ये दिसला होता.
ममता कुलकर्णी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक गणली जायची. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अभिनयाने लोकांना वेड लावले होते.आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. 1992 मध्ये 'तिरंगा' सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमातून ममता कुलकर्णीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. या सिनेमात ममताने छोटी भूमिका साकारली होती. 1993 मध्ये ‘आशिक आवारा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला याच सिनेमाने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. पण ड्रग तस्करी करणाऱ्या विकीसोबत तिचे नाव जोडले गेले. विकीसोबत तिने लग्न देखील केले असे म्हटले जाते. ड्रग तस्करीच्या प्रकरणात विकीला नंतर अटक झाली. दुसरीकडे ममात कुलकर्णीनेही संन्यास घेतला.